शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसमर्पण केलेल्या आरोपीने काढून दिली वाघाची दोन किलो हाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 18:59 IST

Nagpur News वाघ शिकार प्रकरणातील आरोपी राहुल भलावी (बनेरा) याने रविवारी आत्मसमर्पण केले. तसेच वाघाची दोन किलो हाडेही काढून दिली.

ठळक मुद्देवाघ शिकार टोळीचे मध्य प्रदेशातही ‘कनेक्शन’

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : खवासा येथे वनविभागाने केलेल्या वाघ शिकार प्रकरणातील आरोपींचे कारनामे फक्त महाराष्ट्रातील जंगलातच नाहीत तर मध्य प्रदेशातील जंगलातही असल्याचा संशय तपास यंत्रणेला आला आहे. दरम्यान, या प्रकरणात गुंतलेल्या आरोपीने रविवारी आत्मसमर्पण केल्यावर पुन्हा वाघाची दोन किलो हाडे काढून दिली. यावरून पोलीस आणि वन विभागाला त्यांच्या आंतरराज्यीय कारवायांचा अंदाज आला आहे. (The surrendered accused submitted two kilo bones of tigers )

२४ ऑगस्टला खवासा येथील वाघ शिकार प्रकरणातील ही कारवाई आहे. २६ ऑगस्टला पारशिवनी तालुक्यातील कैलास भलावी (बनेरा) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून वाघ शिकार प्रकरणातील हाडे जप्त करण्यात आली होती. यातीलच आरोपी राहुल भलावी (बनेरा) याच्याही मागावर पेंच व्याघ्र प्रकल्पाची चमू होती. पथकाला हुलकावणी देत बरीच ठिकाणे बदलल्यावर अखेर त्याने रविवारी आत्मसमर्पण केले. वाघाची दोन किलो हाडेही काढून दिली. ही हाडे देवलापर वन परिक्षेत्रातील पिंडकेपार भागातील वाघाच्या शिकारीतील असल्याचा वन विभागाला संशय आहे. प्रयोगशाळेतील तपासणीनंतर हे कळणार आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशातही गुन्हा दाखल असल्याने या दोघांनाही तेथील वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. या दोघांसोबत अनेक जण यात गुंतले असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी दोन्ही राज्यातील यंत्रणा एकमेकांशी संपर्क राखून आहे.

चार दिवसापूर्वी दोन कारवाया

दरम्यान, २४ ऑगस्टला पिंडकेपार येथील रोशन उईके आणि नर्बद पुन्नू कोडवते या दोघांना भरमार बंदूक आणि हरीण, रानडुक्कर या वन्यप्राण्यांची हाडे आणि शिंगांसह अटक केली होती. रामटेक वन उपविभागाच्या या कारवाईनंतर मध्य प्रदेश वनविभागाकडे या आरोपींना सोपविले होते. या कारवाईनंतर २७ ऑगस्टला वाघाच्या दातासह चार जणांना नागपूर वन विभागाच्या बुटीबोरी वनपरिक्षेत्राकडून अटक करण्यात आली होती. या सर्व घटनांमधील आरोपींचा एकमेकांशी असलेला संंबंध तपासला जात आहे.

...

टॅग्स :Tigerवाघ