शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

१६० सागवान तस्करांचे आत्मसमर्पण

By admin | Updated: December 23, 2014 00:35 IST

सिरोंचा व आसरअल्ली वनपरिक्षेत्राच्या संयुक्त विद्यमाने १६० सराईत सागवान तस्करांनी राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्बरिशराव आत्राम यांच्या समक्ष सशस्त्र आत्मसमर्पण केले.

सराईत सागवान तस्करांचा समावेश : आत्राम यांचे समक्ष सशस्त्र शरणागतीसिरोंचा : सिरोंचा व आसरअल्ली वनपरिक्षेत्राच्या संयुक्त विद्यमाने १६० सराईत सागवान तस्करांनी राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्बरिशराव आत्राम यांच्या समक्ष सशस्त्र आत्मसमर्पण केले. आसरअल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरीचे उपविभागीय दंडाधिकारी जितेंद्र पाटील होते. मंचावर सिरोंचाचे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी पवार, तालुका दंडाधिकारी केशव मिश्रा, संवर्ग विकास अधिकारी पांडुरंग मरस्कोल्हे, जि. प.महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, पंचायत समिती सभापती लालूबाई मडावी, आसरअल्लीचे सरपंच लक्ष्मण सिडाम, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन कलाक्षपवार, जि. प. सदस्य व्यंकटेश्वर शानगोंडा, निर्मला इप्पापुला, पं. स. सदस्या कलावती झोडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दामोधर अरगेलवार, राष्ट्रीय परिषदचे अध्यक्ष सत्यनारायण मंचालवार, संदीप राचर्लावार, नाविसचे तालुकाध्यक्ष बापू रंगुवार आदी उपस्थित होते.प्रथम निसर्गदेवतेचे पूजन करून कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला.आसरअल्ली येथील भाष्कर गुडीमेटला यांच्या वाद्यवृंद संचाने पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे गीत तेलगू भाषेत सादर केले. उपविभागीय वनाधिकारी एल. एम. बेलेकर यांनी लाकूड तस्करीपासून ग्रामीणांना परावृत्त करून सामाजिक प्रवाहात आणण्याबाबतची वनविभागाची भूमिका व भविष्यातील विविध उपक्रमांबद्दलची माहिती प्रास्ताविकातून विषद केली. याप्रसंगी कलाक्षेपवार यांच्यासह आत्मसमर्पित तस्करांनीही मनोगत व्यक्त करताना सागवन तस्करीस तिलांजली देत असल्याचे सांगून स्टॅम्प पेपरवर सत्यापन केले. ना. आत्राम यांनी आत्मसमर्पित तस्करांचे अभिनंदन करून त्यांच्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.संचालन वनरक्षक सुजाता अडगोपुलवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)