शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

मेडिकलला सचिवांची ‘सरप्राईज व्हिजिट’

By admin | Updated: December 25, 2014 00:25 IST

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी बुधवारी मेडिकलला अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी सफाईकामावर समाधान व्यक्त केले असले तरी सोनोग्राफीसाठी महिनाभर

सफाईवर समाधान : सोनोग्राफीच्या ‘वेटिंग’वर उपस्थित केले प्रश्न नागपूर : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी बुधवारी मेडिकलला अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी सफाईकामावर समाधान व्यक्त केले असले तरी सोनोग्राफीसाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागत असल्यावर नाराजी व्यक्त केली. सोनोग्राफीच्या आणखी दोन मशीन खरेदी करण्याचे निर्देश दिले. मेडिकलनंतर सचिवांनी दंत महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयालाही भेट दिली. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी का होईना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी मेडिकलची पाहणी केली. तीन तास चाललेल्या या पाहणीची सुरुवात त्यांनी अपघात विभागापासून केली. येथील साफसफाईवर त्यांनी समाधान व्यक्त करीत बाह्यरुग्ण विभागाला भेट दिली. येथील कार्यपद्धतीची माहिती घेतली असता त्यांनी ‘गुड वर्क’ असा शेरा दिला. येथून त्या औषध वितरण विभागात गेल्या. दोन्ही भागात असलेल्या औषध वितरणाच्या खिडक्यांवर आश्चर्य व्यक्त केले. आवश्यक बदल करण्याच्या सूचना केल्या.बालरोग विभागाची केली स्तुतीम्हैसकर यांनी प्रसूती वॉर्डाची पाहणी करताना अचानक बालरोग विभागाचा वॉर्ड कुठे आहे, तो दाखवा, असे फर्मान सोडले. वॉर्ड क्र. ५ मध्ये आल्यावर त्यांनी तेथील व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले. विशेषत: स्वच्छतेला घेऊन विशेष काळजी घेण्यात आल्याने त्यांनी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांचे कौतुक केले. ‘फ्लोअर बेड’च्या जागी ‘फोल्डिंग बेड’ अस्थिरोग विभागाच्या वॉर्डात रुग्णांच्या तुलनेत खाटा कमी पडल्याने काही रुग्ण जमिनीवर उपचार घेत होते. म्हैसकर यांनी अचानक या वॉर्डाची पाहणी केली असता आश्चर्य व्यक्त केले. यावर उपाययोजना म्हणून ‘फ्लोअर बेड’च्या जागी ‘फोल्डिंग बेड’ लावण्याच्या सूचना दिल्या. सोनोग्राफीच्या मशीन्स वाढवारेडिओलॉजी विभागात सोनोग्राफीसाठी वाढत्या प्रतीक्षा यादीला घेऊन म्हैसकर यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी विशेषत: गर्भवती महिलांना त्याच दिवशी अहवाल देण्याचे निर्देश दिले. यासाठी स्त्रीरोग विभागातच सोनोग्राफी मशीन लावता येईल का, यावर चर्चा करून येत्या काही महिन्यात दोन जास्तीच्या मशीन खरेदी करण्याचे निर्देश दिले. दहा हिमोडायलिसीस मशीनची गरजसुपर स्पेशालिटीच्या नेफ्रोलॉजी विभागात सात हिमोडायलिसीस मशीन आहेत. यातील तीन नादुरुस्त आहेत. तीन खरेदीच्या प्रक्रियेत आहेत. यावर म्हैसकर यांनी रुग्णांची गर्दी विचारात घेऊन किमान दहा हिमो डायलिसीस मशीनची गरज आहे, असे लक्षात आणून दिले. यावेळी त्यांनी कॅथलॅबपासून इतरही विभागांची पाहणी केली.