शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सुरमणी पं. प्रभाकर धाकडे यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:18 IST

सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना राज्य शासन सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करते. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा मुंबईत बुधवारी केली. वाद्यसंगीत क्षेत्रात प्रसिद्ध व्हायोलिनवादक सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजी यांना यावर्षीचा पुरस्कार घोषित करण्यात आला. त्यांच्या संगीत साधनेचा हा गौरव मानण्यात येत आहे.

ठळक मुद्देसंगीत साधनेचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांना राज्य शासन सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करते. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा मुंबईत बुधवारी केली. वाद्यसंगीत क्षेत्रात प्रसिद्ध व्हायोलिनवादक सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजी यांना यावर्षीचा पुरस्कार घोषित करण्यात आला. त्यांच्या संगीत साधनेचा हा गौरव मानण्यात येत आहे.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची ख्याती आहे. देशविदेशातून त्यांच्याकडे व्हायोलिन शिकण्यासाठी शिष्य येत असतात. धाकडे गुरुजींबरोबरच विविध क्षेत्रातील कलावंतांना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यात नाट्यक्षेत्रात रवी पटवर्धन, गायन- माधुरी विश्वनाथ ओक, उपशास्त्रीय संगीत- श्याम देशपांडे, मराठी चित्रपट - उषा नाईक, कीर्तन - ह.भ.प. विनोदबुवा खोंड, शाहीर -शाहीर विजय जगताप, नृत्य - माणिकबाई रेंडके, आदिवासी गिरीजन - वेणू बुकले, तमाशा - चंद्राबाई अण्णा आवळे, लोककला - मोहन कदम व कलादान - श्रीकांत धोंगड यांचा समावेश आहे. या पुरस्काराचे स्वरुप १ लाख रुपये रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.शासनाने माझ्या कलागुणांची कदर केलीसंगीताचा वारसा घरातूनच मिळाला आहे. मी फक्त संगीताची साधना केली आहे. त्यापोटीच अनेक कलावंतांनी माझ्याकडून संगीताचे धडे गिरविले आहे. आता शासनानेही माझ्या कलागुणांची कदर केली आहे. सांस्कृतिक मंत्र्यांनी माझ्या नावाची घोषणा केल्याचा आनंद आहे. मी शासनाचा आभारी आहे.सूरमणी पं. प्रभाकर धाकडे, प्रसिद्ध व्हायोलिनवादक

 

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर