शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 20:27 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘ड्रामा’ संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. ‘ट्रॉमा’मध्ये जनरेटर असताना त्याचा सोयीपासून शस्त्रक्रिया गृहांना दूर ठेवण्यात आले. यामुळे सोमवारी अचानक वीज खंडित झाल्याने डॉक्टरांवर टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. मेडिकलच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत विभागाच्या या गलथानपणामुळे रुग्णाचा जीव धोक्यात आल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्दे सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथानपणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘ड्रामा’ संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. ‘ट्रॉमा’मध्ये जनरेटर असताना त्याचा सोयीपासून शस्त्रक्रिया गृहांना दूर ठेवण्यात आले. यामुळे सोमवारी अचानक वीज खंडित झाल्याने डॉक्टरांवर टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. मेडिकलच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत विभागाच्या या गलथानपणामुळे रुग्णाचा जीव धोक्यात आल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.विशेष म्हणजे, लोकलेखा समितीने ट्रॉमा केअर सेंटरला भेट दिली असताना ही घटना घडली. परंतु त्यांच्यापासून हा घटना लपवून ठेवण्यात आल्याची माहिती आहे.रस्ते अपघातातील जखमींना पहिल्या तासात (गोल्डन अवर) तातडीने वैद्यकीय सोई मिळाव्यात या दृष्टीने मेडिकलमध्ये ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले. दोन वर्षांपासून हे सेंटर रुग्ण सेवेत आहे. परंतु येथील त्रुटींना घेऊन हे सेंटर नेहमीच चर्चेत राहिले आहे. याला घेऊनच मे २०१८ रोजी महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीने पाहणी केली. यात विना कॅज्युअल्टी शिवाय ट्रॉमा केअर सेंटर सुरू असल्यावर आश्चर्य व्यक्त केले. त्यानुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पूर्ण क्षमतेने कॅज्युअल्टीला सुरुवात झाली. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अद्ययावत सोयी उपलब्ध असताना मात्र त्याचा फायदा होत नसल्याचेही चित्र आहे. लाखो रुपये खर्चून जनरेटरची व्यवस्था केली असताना बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने शस्त्रक्रिया गृहाशी त्याची जोडणीच केली नाही. यामुळे वीज खंडित झाल्यास शस्त्रक्रियांना फटका बसतो.सूत्रानुसार, लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. गोपालदास अग्रवाल यांनी सोमवार १६ जुलै रोजी ट्रॉमा केअर सेंटरला भेट दिली. सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान ही समिती ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पाय ठेवत नाही तोच वीजपुरवठा खंडित झाला. जनरेटर सुरू झाले, परंतु शस्त्रक्रियागृह अंधारात बुडाले. डॉक्टरांनी प्रसंगावधान राखून टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया सुरू ठेवली. या प्रकाराच्या माहितीपासून लोकलेखा समितीला दूर ठेवण्यात आले. यामुळे याची फारशी चर्चा झाली नाही.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयpwdसार्वजनिक बांधकाम विभाग