शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार वितरण सोहळा २२ मार्चला

By admin | Updated: March 18, 2015 02:45 IST

लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त प्रदान करण्यात येणारा...

नागपूर : लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक आणि लोकमत सखी मंचच्या संस्थापक तसेच संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त प्रदान करण्यात येणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार २२ मार्च रोजी चिटणीस पार्क, महाल येथे प्रदान करण्यात येणार आहे.पुरस्कार समारंभात राष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक हरिहरन यांच्या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच ‘सोल आॅफ इंडिया’ बँडचे सादरीकरण संगीत रसिकांसाठी विशेष आकर्षणाचा विषय असणार आहे. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड प्रामुख्याने उपस्थित राहतील. महाराष्ट्र आणि गोवा येथे सखी मंचाच्या माध्यमातून महिलांच्या सशक्तीकरणाचे यशस्वी प्रयत्न करणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा यांना संगीतात विशेष रुची होती. त्यांनी आयुष्यभर स्वरांची साधना केली. त्यांच्या संगीत साधनेचा आदर करीत मागील वर्षी त्यांच्या प्रथम स्मृतिनिमित्त सूर ज्योत्स्ना पुरस्काराला प्रारंभ करण्यात आला. संगीत क्षेत्रात नवोदित प्रतिभावंत गायकांना सन्मानित करण्यासाठी स्त्री आणि पुरुष असे दोन गट पुरस्कारासाठी ठेवण्यात आले. या पुरस्काराचे परीक्षक म्हणून पं. जसराज, डॉ. एल. सुब्रमण्यम, हरिहरन, कविता कृष्णमूर्ती आणि प्रसून जोशी यांनी जबाबदारी स्वीकारली होती. यंदाही दिग्गज कलावंतांच्या परीक्षणातून तावून सुलाखून आलेल्या नवोदित कलावंतांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चिटणीस पार्क, महाल येथे होणाऱ्या भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हरिहरन यांचे सुरेल गायन आणि सोल इंडिया बँडचे संगीत या कार्यक्रमाला वेगळी उंची प्रदान करणार आहे. (प्रतिनिधी)