शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालय : युग चांडक खून प्रकरणावर जानेवारीत अंतिम सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 21:07 IST

सर्वोच्च न्यायालयामध्ये युग चांडक खून प्रकरणावर ९ जानेवारीपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. कुरियन जोसेफ, न्या. दीपक गुप्ता व न्या. हेमंत गुप्ता यांनी गुरुवारी हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ९ जानेवारी रोजी ठेवून घेतले.

ठळक मुद्देदोन आरोपींना झालीय फाशीची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयामध्ये युग चांडक खून प्रकरणावर ९ जानेवारीपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. कुरियन जोसेफ, न्या. दीपक गुप्ता व न्या. हेमंत गुप्ता यांनी गुरुवारी हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी ९ जानेवारी रोजी ठेवून घेतले.राजेश धन्नालाल दवारे (२३) व अरविंद अभिलाष सिंग (२७) अशी प्रकरणातील आरोपींची नावे असून राजेश कळमन्यातील वांजरी ले-आऊट, तर अरविंद जरीपटक्यातील प्रीती ले-आऊट येथील रहिवासी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फाशी व अन्य शिक्षा कायम ठेवल्यामुळे आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. ४ फेब्रुवारी २०१६ रोजी सत्र न्यायालयाने भादंविच्या कलम ३६४ -अ (खंडणीसाठी अपहरण) अंतर्गत मरेपर्यंत फाशी, कलम ३०२ (हत्या) अंतर्गत मरेपर्यंत फाशी व कलम २०१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावल्यानंतर आरोपींनी त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच, सरकारने फाशीची शिक्षा कायम करण्याचे प्रकरण उच्च न्यायालयात सादर केले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून आरोपींचे अपील फेटाळले. सर्वोच्च न्यायालयात फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यातर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा व अ‍ॅड. गौरव अग्रवाल तर, सरकारतर्फे अ‍ॅड. निशांत काटनेश्वरकर यांनी कामकाज पाहिले.असे आहे प्रकरणआरोपी राजेश हा युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात कर्मचारी होता. युग नेहमीच रुग्णालयात जात होता. एक दिवस राजेशने युगला थापड मारली होती. परिणामी, डॉ. चांडक राजेशवर रागावले होते. याशिवाय राजेश रुग्णांकडून अतिरिक्त पैसे वसुल करीत होता. यासंदर्भात अनेक रुग्णांनी डॉ. चांडक यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे डॉ. चांडक यांनी राजेशला कामावरून काढून टाकले होते. त्याचा राग राजेशच्या मनात होता. त्यातून त्याने आरोपी अरविंदसोबत मिळून खंडणीसाठी युगचे अपहरण व हत्या करण्याचा कट रचला. १ सप्टेंबर २०१४ रोजी आरोपींनी युगला दुचाकीवर बसवून कोराडी रोडने निर्जण ठिकाणी नेले व तेथे त्याची हत्या केली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMurderखून