लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने सुधाकर कोहळे यांना डावलून मोहन मते यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी आपल्या रोषाला वाट करून दिली.रिंगरोडवरील उदयनगर चौकात या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून निदर्शने सुरू केली. सामान्य कार्यकर्त्यांचा अपमान, बंडखोर मित्राचा सन्मान असे बॅनर हाती घेतलेले काही कार्यकर्ते येथे दाखल झाले व त्यांनी घोषणा देत आपले निदर्शन सुरू केले.भाजपने मंगळवारी आपली पहिली यादी जाहीर केली होती. तीत सुधाकर कोहळे यांचे नाव न दिसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. बुधवारी दुपारी सुधाकर कोहळे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचेही वृत्त आहे.
Vidhan Sabha Election 2019; नागपुरात सुधाकर कोहळे समर्थक उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 13:58 IST
दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने सुधाकर कोहळे यांना डावलून मोहन मते यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी आपल्या रोषाला वाट करून दिली.
Vidhan Sabha Election 2019; नागपुरात सुधाकर कोहळे समर्थक उतरले रस्त्यावर
ठळक मुद्देमोहन मते यांना उमेदवारी दिल्याने नाराजी