शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बाल कर्करुग्णांना अद्ययावत उपचाराचा आधार  : 'कॅनकिड' संस्थेशी सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 23:29 IST

अर्धवट उपचारामुळे अकाली दगावणाऱ्या बाल कर्करोग रुग्णांची संख्या मोठी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने नागपूरसह मुंबई, पुणे व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचा ‘कॅनकिड’ या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे.

ठळक मुद्देनागपूरसह मुंबई, पुणे, औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भारतात दरवर्षी सुमारे ३० ते ४० हजार मुलांना कर्करोग (कॅन्सर) होतो. त्यापैकी ७० ते ८० टक्के बालकांचा जागरूकतेचा अभाव, उशिरा निदान, अपुऱ्या उपचारांच्या सोयी किंवा आवाक्याबाहेरचा खर्च यामुळे मृत्यू होतो. बालपणातील कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण १६.२३ टक्के एवढा आहे. विशेषत: अर्धवट उपचारामुळे अकाली दगावणाऱ्या बाल कर्करोग रुग्णांची संख्या मोठी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने नागपूरसह मुंबई, पुणे व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचा ‘कॅनकिड’ या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे.नागपूर मेडिकलच्या बालरोग विभागाच्यावतीने नुकतेच कर्करोगावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी या सामंजस्य कराराची माहिती दिली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. आनंद पाठक, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती जैन, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. हरीश वरभे, डॉ. पंकज द्विवेदी व डॉ. रत्ना शर्मा उपस्थित होते.करारामुळे अद्ययावत उपचार व आर्थिक मदतडॉ. मुखर्जी म्हणाले, २०१२ पासून मेडिकलमधील कर्करोगाच्या बालरुग्णांना ‘कॅनकिडस्’कडून सेवा दिली जात आहे. या करारामुळे ही सेवा आता अधिकृत झाली आहे. यात चार रुग्णालयांचा समावेशही करण्यात आला आहे. या रुग्णालयांत उपचार घेणाऱ्याबाल कर्करुग्णांचा पाठपुरावा घेणे, उपचार सोडलेल्या रुग्णांचा शोध घेणे, रुग्णांच्या येण्या-जाण्याची आर्थिक अडचण सोडविणे, त्यांच्या शिक्षणाची सोय करारामध्ये अंतर्भूत आहे. दुर्गम भागात वैद्यकीय सेवा पोहचविण्याची गरजडॉ. लहाने म्हणाले की, गावखेड्यासोबतच दुर्गम भागात डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा पोहचविण्याची गरज आहे. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. बाल कर्करुग्णांसाठी स्वतंत्र खाटांची सोय व इतरही अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही डॉ. मित्रा यांनी दिली. प्रास्ताविक डॉ. जैन यांनी केले.

टॅग्स :cancerकर्करोगMedicalवैद्यकीय