शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर, पोलिसांसह सर्वांना सुरक्षा साधनांचा पुरवठा : हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 21:25 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाची लागण होऊ नये याकरिता डॉक्टर व पोलिसांसह सर्व संबंधित ...

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहितीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाची लागण होऊ नये याकरिता डॉक्टर व पोलिसांसह सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनांचा पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. सिटीझन फोरम फॉर इक्वॅलिटीचे अध्यक्ष मधुकर कुकडे यांच्या जनहित याचिकेमध्ये यासंदर्भात सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.प्रतिज्ञापत्रानुसार, सॅनिटायझर, मास्क व इतर वैद्यकीय वस्तू खरेदी करण्यासाठी पोलीस विभागाला आतापर्यंत २० लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. तसेच, पोलीस स्टेशन व पोलीस मुख्यालय सॅनिटाईझ करण्यासाठी १८ मे रोजी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेले १६४.४० लाख आणि स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फ ंडमधील ५० लाख रुपये डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन, मेयो रुग्णालय व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वितरित करण्यात आले आहेत. या निधीतून एन-९५ मास्क, ट्रिपल लेयर मास्क, सोडियम हायपोक्लोराईट, सॅनिटायझर, हॅण्ड ग्लोव्हज व पीपीई किटची खरेदी करण्यात आली आहे. ही सुरक्षा साधने डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाºयांना वितरित करण्यात आली आहेत.असे आहे याचिकाकर्त्याचे म्हणणेदेशावरील कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, अर्धवैद्यकीय कर्मचारी, पोलीस, फार्मासिस्ट आदी कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात उतरून कर्तव्य बजावत आहेत. त्यांना कोरोनाची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. त्यामुळे अशा सर्व कर्मचाºयांची ठराविक कालावधीनंतर कोरोना चाचणी करण्यात यावी. यासंदर्भात राष्ट्रीयस्तरावर तातडीने प्रभावी धोरण तयार करण्यात यावे आणि सर्वांना आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर कामकाज पाहत आहेत.सध्या उपलब्ध पीपीई किटमेयो - ११,८१३मेडिकल - १५,४६०डीसीएस - ३,४६०डीएचओ - ६५०एकूण - ३१,३८३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालय