शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

अंधश्रद्धेचे दुकान चालविणारे शासनकर्ते झाले

By admin | Updated: March 21, 2017 02:11 IST

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱ्यांवर मात करण्यासाठी देशात अंधश्रद्धा संवर्धन समित्या आणि बुद्धिवाद निर्मूलन समित्या स्थापन झाल्या आहेत.

यशवंत मनोहर : मअंनिसच्या तिसऱ्या खंडाच्या पुस्तकांचे प्रकाशननागपूर : अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱ्यांवर मात करण्यासाठी देशात अंधश्रद्धा संवर्धन समित्या आणि बुद्धिवाद निर्मूलन समित्या स्थापन झाल्या आहेत. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे व त्यावर दुकान चालविणारे शासनकर्ते होत आहेत. साक्षात लोकांवर शासन करण्यासाठी अंधश्रद्धेची नेमणूक केली जात आहे. अशावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य अतिशय कठीण झाले आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या मासिकातील निवडक लेखांचा संग्रह असलेल्या ‘समग्र अंधश्रद्धा निर्मूलन’ या तिसऱ्या खंडाच्या पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सोमवारी विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना डॉ. मनोहर यांनी वर्तमान परिस्थितीत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यावर विचार व्यक्त केले. आज अध्यात्माच्या नावावर समाजासमोर मोठा धोका निर्माण केला जात आहे. ईश्वर ही रूढी आहे, ते वास्तव नाही. ही रूढी माणसाने निर्माण केली. मात्र ही रूढी इतकी लोकप्रिय झाली की आज माणूस ती सोडायला तयार नाही. या देशातील लोकांचे मन धार्मिक, आध्यात्मिक, परंपरा, संप्रदायवादी व मूलतत्त्ववादी आहे. लोकांना यातच गुरफटून ठेवण्यासाठी आणि माणूस होण्याचा मार्ग रोखणारी आयुधे निर्माण केली गेली आहेत. अशावेळी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अधिक जोखिमीचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)कुलगुरूंनी विदर्भाची सांस्कृतिक परंपरा तोडलीविद्यापीठ, शिक्षण संस्था, शाळा-महाविद्यालये ही शिक्षणासोबत नवनिर्मितीचा विचार पेरण्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची केंद्रे असतात. विचार स्वातंत्र्य आणि विचारांचा आदर करण्याची विदर्भाची परंपरा आहे. वैचारिक भेदभाव ही नागपूर विद्यापीठाची परंपरा नाही. मात्र सीताराम येचुरींचा कार्यक्रम रद्द करून नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विदर्भाची ही सांस्कृतिक परंपरा मोडून नवी अंधश्रद्धा निर्माण केल्याची घणाघाती टीका डॉ. श्रीपाद जोशी यांनी यावेळी केली. अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि नवभारत निर्मितीचा विचार विद्यापीठातून, शाळा-महाविद्यालयामधून घरोघरी पोहचणे आवश्यक आहे. मात्र कोणत्या कुलगुरूंच्या भरवशावर हे कार्य करावे, हा प्रश्न आहे. विद्यापीठात विचार मांडायचा नाही तर कुलगुरूंच्या घरी विचार मांडायचा काय, असा उपरोधिक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.देशापुढे मूलतत्त्ववादाचा मोठा धोकायावेळी उपस्थित अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी यांनीही वर्तमान परिस्थिती व राजकीय घटनाक्रमावर कडाडून टीका केली. आजचे नवतंत्रज्ञानाचे माध्यम परिवर्तनासाठी उपयोगी पडेल, ही आशा फोल ठरली आहे. भारतीय राज्यघटना ही अंधश्रद्धा निर्मूलनाचा व शास्त्रीय समाज निर्माण करण्याचा जाहीरनामा आहे. असे दस्तावेज जगात कुठेही सापडणार नाही. मात्र या राज्यघटनेला अपेक्षित शास्त्रीय समाज निर्माण करण्याची जबाबदारी असलेल्या लोकशाहीच्या सभागृहात अतिशय अशास्त्रीय लोक पोहोचले आहेत. लोकतांत्रिक अधिकारामधून अशी अव्यवहारिक व्यवस्था आकार घेत आहे आणि हा समाज, राजसत्ता, प्रसार माध्यमे व या सर्वांना भांडवल पुरविणारे उद्योजक नवतंत्रज्ञानाच्या मदतीने हे सर्व घडवून आणत आहेत. देशापुढे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीपुढे सर्वात मोठा धोका निर्माण झाल्याची टीका डॉ. जोशी यांनी यावेळी केली. संविधान हे नवभारत निर्मितीचे दस्तावेज आहे. मात्र हा जाहीरनामा नाहीसा करण्यासाठी प्रचंड प्रयत्न होत आहेत.यासाठी राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक शक्ती प्रचंड वेगाने सक्रिय झाली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे या विषमतावादी परिस्थितीचे बळी ठरले असल्याचे मनोगत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी समितीच्या भविष्यातील वाटचालीचे विवरण करीत अंनिसची चळवळ अधिक वेगाने गतिमान करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या वेळी विजय सालंकर, महादेव भुईभार, अनिसचे जिल्हाध्यक्ष संजय शेंडे, गजेंद्र सुरकार, ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ वैज्ञानिक प्रभाकर नानावटी यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संपादक राहुल थोरात यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रिता धांडेकर यांनी केले. कार्यक्रमात मधुकर धंद्रे, सुनील भगत, जयेंद्र पेंडसे, प्रा. सुशील मेश्राम, स्वप्नील हुमणे आदींचा सहभाग होता.