शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुपरची ‘अ‍ॅन्जिओग्राफी’ थांबली

By admin | Updated: August 5, 2016 03:04 IST

गरिबांच्या हृदयावर वरदान ठरलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात ‘डाय’चा तुटवडा पडल्याने ‘अ‍ॅन्जिओग्राफी’ थांबली आहे.

 ‘डाय’चा तुटवडा : पुरवठादाराने आवश्यक कागदपत्राचे कारण केले पुढे नागपूर : गरिबांच्या हृदयावर वरदान ठरलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात ‘डाय’चा तुटवडा पडल्याने ‘अ‍ॅन्जिओग्राफी’ थांबली आहे. चार दिवसानंतरही ‘डाय’ न मिळाल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत. संबंधित पुरवठादाराला रुग्णालय प्रशासनाकडून आवश्यक कागदपत्र उपलब्ध न झाल्याने त्याने हा पुरवठा थांबविल्याची माहिती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल)संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कार्यपद्धतीत बदल होत आहे. परिणामी, दिवसेंदिवस रुग्णांची गर्दी वाढत आहे. विशेषत: हृदय रोग विभागात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या विभागात नवीन ‘विप्रो जीई-कॅथलॅब’ आहे. या यंत्रामुळे दिवसभरात २० च्यावर अ‍ॅन्जिओग्राफी तर चार-पाच अ‍ॅन्जिओप्लास्टी होते. हृदयावर अ‍ॅन्जिओग्राफी करण्यापूर्वी आवश्यक असणारे द्रव्य (डाय) इंजेक्शनद्वारे दिले जाते. नेमका याच द्रव्याचा तुटवडा पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विभागाने एक महिन्यापूर्वीच पुरवठादाराला ‘डाय’ची मागणी केली होती. परंतु पुरवठादाराने साहित्य खरेदीसाठी आवश्यक असलेल्या रुग्णालयाचा ‘पॅन क्रमांक’ मागितला. परंतु रुग्णालयाच्या नावाचे ‘पॅन’च नाही. यामुळे खरेदीत उशीर झाल्याने गेल्या चार दिवसांपासून अ‍ॅन्जिओग्राफी बंद पडली. याचा फटका मात्र रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बसतो आहे. रेडिओलॉजी विभागातही डायची गरज भासते. सिटी स्कॅन, सोनोग्राफी तसेच एमआरआय करण्यापूर्वी डायची गरज असते. परंतु येथे ते रुग्णांनाच विकत आणावे लागत असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी) सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘डाय’चा तुटवडा पडल्याने अ‍ॅन्जिओग्राफी बंद आहे. संबंधित पुरवठादाराने पहिल्यांदाच ‘पॅन क्रमांक’ मागितल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. दोन्ही रुग्णालयाचे ‘पॅन’ काढण्यासाठी वेगाने कारवाई सुरू आहे. या संदर्भातील माहिती पुरवठादाराला देण्यात आली आहे. त्याने साठा रवाना केला असून लवकरच तो रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. -डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल