शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत जन्मदर वाढतोय

By admin | Updated: September 28, 2015 03:05 IST

उपराजधानीत गेल्या चार वर्षांत मुलामुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ५५ हजार ४१५ बालके तर २०१४ मध्ये ५८ हजार १८० बालके जन्माला आल्याची ....

दरदिवशी जन्माला येतात १५० वर बालके : जुलैअखेर ११३३ बालकांचा मृत्यू नागपूर : उपराजधानीत गेल्या चार वर्षांत मुलामुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ५५ हजार ४१५ बालके तर २०१४ मध्ये ५८ हजार १८० बालके जन्माला आल्याची महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडे नोंद आहे. त्यानुसार दरदिवशी साधारण १५० बालके जन्माला येत आहेत. विशेष म्हणजे, जन्मदर वाढत असताना एक वर्षाखालील बालकांच्या मृत्यूची संख्याही कमी होताना दिसून येत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीच्या अधिकारात ही माहिती सामोर आली आहे.२०१४ ते जुलै २०१५ पर्यंत जन्म व मृत्यूच्या प्रमाणपत्रातून मनपाच्या तिजोरीत ३० लाख ७२ हजार ३०६ रुपये जमा झाले आहेत. गेल्या चार वर्षांत जन्मदरही वाढला आहे. २०१२ मध्ये २८६५९ मुले तर २६७५६ मुली, २०१३ मध्ये २९४९६ मुले तर २७६८७ मुली, २०१४ मध्ये ३००६२ मुले तर २८११८ मुली जन्माला आल्या. या वर्षी जुलै महिन्यापर्यंत १५७४७ मुले तर १५०६४ मुली जन्मल्याची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)पुरुष मृत्यूची संख्या मोठीउपराजधानीत महिलांच्या तुलनेत पुरुष मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. २०१२ मध्ये २३८२८ एकूण मृत्यू झाले. यात पुरुषांची संख्या १४२४९ एवढी होती. २०१३ मध्ये एकूण मृत्यूची संख्या २४५२१ मधून पुरुषांची संख्या १४६६६ होती. २०१४ मध्ये २५७४२ मृत्यू झाले यात १५६०० पुरुष मृतांची संख्या होती. या वर्षी जुलै महिन्यापर्यंत ८७५५ पुरुष तर ५७९२ महिलांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.तीन वर्षांत ५२४५ बालकांचा मृत्यूशहरात २०१२ ते २०१४ या तीन वर्षांत एक वर्षाखालील ५२४५ बालकांचा मृत्यू झाला. २०१२ मध्ये १७६८, २०१३ मध्ये १७६५, २०१४मध्ये १७१२ बालकांच्या मृत्यू नोंद आहे. या वर्षी जुलै महिन्यापर्यंत ११३३ बालकांचा मृत्यू झाला आहे.