शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकरांचे प्रेम बघून भारावले महानायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 21:56 IST

शहरात सुरू असलेल्या हिंदी सिनेमाच्या शुटींगसाठी आलेले महानायक अमितभा बच्चन यांना बघण्यासाठी नागपूरकर चांगलेच उत्सुक आहेत. कालपर्यंत मोहननगर येथे गर्दी करणाऱ्या त्यांच्या फॅन्सनी आपला मोर्चा वर्धा रोडावरील हॉटेलकडे वळविला आहे. हॉटेल व्यवस्थापनाकडून बिग बी पर्यंत कुणालाही पोहचू दिले जात नसले तरी अनेक प्रयत्नानंतर गुरुवारी त्यांच्या फॅन्सनी अमिताभ यांना हॉटेलच्या लॉबीमध्ये अखेर घेरलेच. अमिताभ यांनी सर्वांचे अभिनंदन करीत हसत हसत आपल्या रुमकडे निघून गेले.

ठळक मुद्देअमिताभने ट्विट करून मानले नागपूरकरांचे आभार : हॉटेलातही पोहचले होते अमिताभचे फॅन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सुरू असलेल्या हिंदी सिनेमाच्या शुटींगसाठी आलेले महानायक अमितभा बच्चन यांना बघण्यासाठी नागपूरकर चांगलेच उत्सुक आहेत. कालपर्यंत मोहननगर येथे गर्दी करणाऱ्या त्यांच्या फॅन्सनी आपला मोर्चा वर्धा रोडावरील हॉटेलकडे वळविला आहे. हॉटेल व्यवस्थापनाकडून बिग बी पर्यंत कुणालाही पोहचू दिले जात नसले तरी अनेक प्रयत्नानंतर गुरुवारी त्यांच्या फॅन्सनी अमिताभ यांना हॉटेलच्या लॉबीमध्ये अखेर घेरलेच. अमिताभ यांनी सर्वांचे अभिनंदन करीत हसत हसत आपल्या रुमकडे निघून गेले. अमिताभ बच्चन यांनी स्वत: हॉटेल व्यवस्थापनाला सांगितले आहे की, जोपर्यंत शुटींगसाठी थांबलो आहे, तोपर्यंत शांतीने काम करू द्यावे. अमिताभला त्यांच्या फॅन्सपासून दूर ठेवण्यासाठी हॉटेल व्यवस्थापनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. असे असताना अमिताभ गुरुवारी जसे हॉटेलात पोहचले तेव्हा त्यांच्या शेकडो फॅन्सनी हॉटेलच्या लॉबीमध्येच त्यांना घेरले. अमिताभचे बाऊन्सर्सनी सुरक्षा घेरा बनविण्यापूर्वीच त्यांच्या फॅन्सनी स्मार्ट फोन काढून सेल्फी काढणे सुरू केले. फॅन्सकडे बघून ते हसले आणि बाऊन्सर्सच्या मदतीने लॉबीतून निघून आपल्या रुममध्ये गेले. यावेळी त्यांनी आपल्या फॅन्सला हात जोडून अभिवादन केले.यानंतर अमिताभ यांनी तीन फोटोसोबत एक ट्विट केला. ज्यात त्यांनी लिहिले आहे ‘... और प्यार अब भी बरकरार है. रोड पर, हॉटेल की लॉबी में और मेरे हृदय में. धन्यवाद नागपूर आपके प्यार के लिए ’. विशेष म्हणजे अमिताभ यांनी ट्विट केल्यानंतर नागपुरातील १२ हजार फॅन्सनी त्याला लाईक केले तर ६९५ लोकांनी त्याला रिट्विट केले.

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनTwitterट्विटर