शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ काळातील रुग्णांची काळजी घेणार ‘सुपर’

By admin | Updated: March 27, 2017 02:23 IST

मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता फार आवश्यक असते. परंतु अनेक गरीब महिला रुग्णांना ‘सॅनिटरी पॅड’चा खर्च परडवत नाही.

रुग्णालयात लागणार ‘सॅनिटरी पॅड वेंडिग मशीन’: राज्यातील पहिलाच प्रयोगसुमेध वाघमारे नागपूर मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता फार आवश्यक असते. परंतु अनेक गरीब महिला रुग्णांना ‘सॅनिटरी पॅड’चा खर्च परडवत नाही. विशेषत: शासकीय रुग्णालयात उपचार घेताना अशा काळात अनेक महिला रुग्णांना अडचणींना सामोर जावे लागते. याची दखल नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने घेऊन १० ‘सॅनिटरी पॅड वेंडिग मशीन’ खरेदी केल्या आहेत. महिला रुग्णांसाठी मोफत ‘सॅनिटरी पॅड’ उपलब्ध करून देणारे राज्यातील हे पहिले रुग्णालय ठरले आहे. भारतात ८८ टक्के स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी जुने कपडे, काहीवेळा वर्तमानपत्र अशांसारख्या साधनांचा उपयोग करतात. परिणामी जवळजवळ ७० टक्के स्त्रियांना जननसंस्थेमध्ये संसर्ग होऊन त्यासंबंधीच्या रोगांना सामोरे जावे लागते. शिवाय हा विषय अत्यंत खासगी असल्याने त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळली जाते. विशेष म्हणजे रुग्ण असतानाही संकोचामुळे या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे आजार आणखी गंभीर होण्याची शक्यता राहते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणारे ८० टक्के रुग्ण हे दारिद्र्यरेषेखालील असतात. यामुळे महिला रुग्णांना डॉक्टरांनी ‘सॅनिटरी पॅड’ वापरण्याची सूचना केली तरी पैशांअभावी ‘पॅड’ वापरले जात नाही. याची दखल रुग्णालय प्रशासनाने घेतली. रुग्णांच्या सोयीसाठी ‘सॅनिटरी पॅड वेंडिग मशीन’ उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने आमदार गिरीश व्यास यांना विनंती केली. आ. व्यास यांनी या मागणीला गंभीरतेने घेत निधी उपलब्ध करून दिला. यामुळे दहा ‘सॅनिटरी पॅड वेंडिग मशीन’ विकत घेण्यात आल्या. नुकत्याच या मशीन रुग्णालात उपलब्ध झाल्या असून मशीनमुळे महिलांचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत.दहा स्वच्छतागृहात लागणार ‘वेंडिग मशीन’सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या महिलांच्या दहा स्वच्छता गृहात हे ‘वेंडिग मशीन’ लागणार आहेत. एका यंत्राची किमत २२ हजार रुपये आहे. या मशीनसोबत वापरलेले ‘सॅनिटरी पॅड’ जाळण्याचे यंत्रही उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे वापरलेल्या पॅडचा कचरा कुठेही दिसणार नाही.ग्रामीण भागात राबविण्यासाठी प्रयत्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या पुढाकारामुळेच हा स्तुत्य उपक्रम हाती घेणे शक्य झाले आहे. आमदार निधीतून दहा ‘सॅनिटरी पॅड वेंडिग मशीन’ खरेदी करण्यात आले आहेत. याचा फायदा रुग्णालयातील रुग्णांना होईल. महिलांच्या आरोग्याशी निगडित असलेला या उपक्रमाची ग्रामीण भागात फार गरज आहे. यासाठी प्रयत्न केले जातील.-आ. गिरीश व्यास