शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वस्तोवस्ती, गल्लोगल्ली फिरताहेत ‘सुपर स्प्रेडर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:07 IST

यांना कोण आवरणार : कोरोनाचे भान नाही, तोंडावर मास्क नाही नागपूर : लॉकडाऊनमुळे एकीकडे करोडो रुपयांचा व्यापार बुडतो आहे. ...

यांना कोण आवरणार : कोरोनाचे भान नाही, तोंडावर मास्क नाही

नागपूर : लॉकडाऊनमुळे एकीकडे करोडो रुपयांचा व्यापार बुडतो आहे. दररोज १० ते १५ लोकांचे जीव जात आहे. हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होत आहे. अडीच हजारांपर्यंत रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहे. पोलिसांनी जागोजागी बंदोबस्त लावला आहे. पण काही टवाळखोर सुपर स्प्रेडर म्हणून वस्तोवस्ती गल्लोगल्ली फिरत आहेत. बंद व्यापारी पेठेच्या आड या टवाळखोरांचे दारूचे गुत्ते सुरू आहेत. या कडेकोट बंदमध्येही खर्रा, दारूही मिळत आहे.

वस्त्यांमधील चौक, बंद दुकानांचे शेड, पानठेले, चहा कॅन्टिनच्या आड काही लोक घोळक्याने बसलेले शहरातील बहुतांश भागात आढळले. गंजीफा कुटणे, गप्पा ठोकणे, मोबाईलद्वारे सिनेमा बघणे, खर्रा, गुटखा चघळणे हे सर्व प्रकार गल्ली-वस्त्यांमध्ये दिसून आले. घोळका करून बसणाऱ्यांना कोरोनाची कुठलीही भीती दिसून येत नाही. तोंडावर मास्क नाही, बसल्या ठिकाणी खर्ऱ्याच्या मारलेल्या पिचकाऱ्या, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर हे तर दूरच आहे. या टवाळखोरांमध्ये युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. यांना हटकायलाही कुणाची हिंमत नाही. कोरोनामुळे कामधंदे बंद असल्याने या टवाळखोरांचा हा ठिय्याच झाला आहे.

- पोलीस दिसताच काढतात पळ

शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर, चौकांमध्ये पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे. पण गल्लीबोळात पोलिसांचे राऊंड होत आहेत. दुकानाच्या शेडखाली घोळका करून बसलेले हे टवाळखोर पोलिसांना बघून पळ काढत आहेत.

- पोलीसांना करावे लागले मासोळी मार्केट बंद

महापालिका प्रशासनाने बुधवारपासून दुपारी १ नंतर जीवनावश्यक वस्तूंचीही दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले. दुपारी १ वाजतानंतर मासोळी बाजारात फेरफटका मारला असता, पोलिसांना येऊन दुकाने बंद करावी लागली.

- शुक्रवारी तलावासमोरील रिकामटेकडे हाकलले

शुक्रवारी तलावाजवळ नेहमीच रिकामटेकड्यांची मैफिल भरलेली असते. दुचाकी वाहने पार्किंग करून चहा, सिगारेटचे झुरके मारणारे तरुण येथे बसलेले असतात. काही भिकारीसुद्धा सावलीच्या आसऱ्याने बसलेले दिसतात. परंतु बुधवारी दुपारी शुक्रवारी तलावाच्या शेजारी शुकशुकाट दिसला. पोलिसांनी येथील चहा, पानठेले बंद केल्याचे सांगण्यात आले.

- सेवासदन चौकात रिचवली जात होती दारू

व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्याने मजूर आणि परिसराली लोक विना कामाने येऊन टाईमपास करताना दिसले. एका बंद दुकानाच्या आडोशाने काही लोक दारूही पिताना आढळले. खर्ऱ्याच्या बाबतीत तर विचारूच नका, पानठेले बंद असले तरी, ठेल्याजवळ उभे राहिल्यावर विक्रेता बरोबर खर्रा आणून देत असल्याचे दिसून आले.