शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

सुपारीचा जीवघेणा धंदा

By admin | Updated: December 14, 2015 02:56 IST

आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक असलेल्या सुपारीची उपराजधानीत बिनबोभाट विक्री होत असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे.

बिनबोभाट विक्री : उपराजधानीत मोठे नेटवर्कनरेश डोंगरे नागपूरआरोग्यासाठी अत्यंत अपायकारक असलेल्या सुपारीची उपराजधानीत बिनबोभाट विक्री होत असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. कॅन्सरसारख्या रोगाची भेट देणाऱ्या या सुपारीच्या विक्रीतून काही गल्लाभरू विक्रेते रोज करोडोंची उलाढाल करीत असून, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा गोरखधंदा आता उपराजधानीत चांगलाच फळला-फुलला आहे.जगाच्या पाठीवर भारतासह अनेक देशात सुपारीचे उत्पादन होते. त्यापैकी इंडोनेशियात निकृष्ट दर्जाची सुपारी ‘स्क्रॅप’ म्हणून डम्पिंग यार्डमध्ये फेकली जाते. ही सुपारी जशीच्या तशी उचलून भारतात आणली जाते. धुवून, पुसून ती विविध प्रांताप्रमाणेच महाराष्ट्रातही आणली जाते. चांगल्या सुपारीत या सडक्या सुपारीचे मिश्रण करून ती विकली जाते. नागपूर, विदर्भात ही सडलेली आणि आरोग्याला अपायकारक असलेली सुपारी बिनबोभाट विकली जाते. कारण येथे खर्ऱ्याला जबरदस्त मागणी आहे. मोठ्या चौकातील एक पानटपरीवाला दिवसभरात खर्ऱ्याच्या १०० ते ३०० पुड्या विकतो. खर्ऱ्यात या सुपारीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याने या सुपारीची विदर्भात मोठ्या प्रमाणात विक्री होते. बनावट सुगंधित सुपारीनागपूर :सडक्या सुपारीवर रासायनिक प्रक्रिया करून बनावट सुगंधित सुपारी तयार केली जाते. ती रजनीगंधा, पानबहार, पानपराग या सारख्या नावाजलेल्या सुगंधित सुपारीच्या बनावट डब्यात किंवा पाऊचमध्ये घालून त्याचीही मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. ‘मिठी‘ सुपारीच्या नावाखाली लहान मुलांनाही ती विकली जाते. या गोरखधंद्यातून गल्लाभरू विक्रेते महिन्याला कोट्यवधी रुपये कमवितात. दुसरीकडे हजारो जणांना कॅन्सरच्या जबड्यात ढकलतात. विशेष म्हणजे, खाणाऱ्याला त्याचे भयावह परिणाम ‘कॅन्सर डिटेक्ट’ झाल्यानंतरच कळतात. अनेकांना या सुपारीपासून बनविलेल्या खर्रा किंवा सुगंधित पानमसाल्यामुळे ‘लॉक जा’ (पुरेसे तोंड न उघडणे) सारख गंभीर आजार जडतात. तहान,भुकेवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. नेटवर्कला चिंटूचा आधार सूत्रांच्या माहितीनुसार, या जीवघेण्या सुपारीच्या धंद्यात इतवारी, वर्धमाननगरातील काही जण सक्रिय आहेत. रोज १०० पेक्षा जास्त सुपारीचे ट्रक ते आणतात. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे हे समाजकंटक सडक्या सुपारीची शेकडो पोती रातोरात विकतात. विशेष म्हणजे, ही सडकी सुपारी विकणारांचे उपराजधानीतील नेटवर्क लकडगंज, कळमन्यातून चालविले जाते. या नेटवर्कसाठी कुख्यात चिंटू काम करतो. अनेकांशी त्याची भागीदारी असल्याचीही चर्चा आहे. कारवाई करण्यासाठी धावलेले संबंधित विभागाचे अधिकारी चिंटू मॅनेज करतो. त्याच्यामुळे धरमपेठ आणि प्रतापनगरसह अन्य भागातही हा गोरखधंदा आता पाय पसरत असल्याचे समजते. या जीवघेण्या सुपारीच्या धंत्यात गुंतलेल्या २०० जणांकडून ‘महाराज‘ नामक गुंड महिन्याला प्रत्येकी २ हजार ( एकूण ४ लाख) रुपये खंडणी वसूल करतो. विविध नेत्यांशी सलगी साधून तो आपला गोरखधंदा चालवतो, अशीही चर्चा आहे. त्याच्या आश्रयानेच ‘कॅन्सर‘विक्रीचा हा धंदा बिनधास्त सुरू असल्याचे समजते. (प्रतिनिधी)