शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सुनील मिश्रा यांना हायकोर्टाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:13 IST

कुलपतींकडे दोन मुद्यांवर प्रलंबित असलेल्या अपील्स तातडीने निकाली काढण्याचे आदेश मिळविण्यासाठी मिश्रा यांनी दाखल केलेल्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी तांत्रिक कारणावरून खारीज केल्या. त्यामुळे मिश्रा यांना जोरदार दणका बसला.

ठळक मुद्देनियमबाह्य कृती केली : दोन्ही याचिका फेटाळल्या

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : कुलपतींकडे दोन मुद्यांवर प्रलंबित असलेल्या अपील्स तातडीने निकाली काढण्याचे आदेश मिळविण्यासाठी मिश्रा यांनी दाखल केलेल्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी तांत्रिक कारणावरून खारीज केल्या. त्यामुळे मिश्रा यांना जोरदार दणका बसला.न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला. गेल्या २४ जुलै रोजी न्यायालयाने याचिकांवर सुनावणी केल्यानंतर कुलपती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव व इतरांना नोटीस बजावून ४ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला होता. असे असताना मिश्रा यांनी १३ आॅगस्ट रोजी या याचिका सुनावणीसाठी न्यायालयाच्या पटलावर आणल्या. दरम्यान, त्यांनी याची माहिती प्रतिवादींना दिली नाही. तसेच, प्रतिवादींना उत्तर दाखल करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत वेळ दिला असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे न्यायालयाने कुलपतींचे सचिव बी. व्ही. रेड्डी यांना सहा आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. तसेच, आदेशाचे पालन करण्यात अपयश आल्यास पुढील तारखेला व्यक्तीश: न्यायालयात हजर होण्यास सांगितले. त्यानंतर नागपूर विद्यापीठाचे वकील सुधीर पुराणिक यांनी प्रतिवादींना उत्तरासाठी ४ सप्टेंबरपर्यंत वेळ असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. परिणामी, मिश्रा यांची नियमबाह्य कृती पुढे आल्यामुळे न्यायालयाने हे प्रकरण पुढील आदेशाकरिता गुरुवारी सुनावणीसाठी ठेवून घेतले होते. दरम्यान, मिश्रा यांना स्वत:च्या चुकीसंदर्भात न्यायालयाचे समाधान करता आले नाही. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या याचिका फे टाळून लावल्या. नागपूर विद्यापीठाने सुनील मिश्रा यांच्या सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनमधील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली नाही. तसेच, मिश्रा यांना विद्यापीठ व विद्यापीठाशी संबंधित परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या दोन्ही कारवायांविरुद्ध मिश्रा यांनी कुलपतींकडे अपील दाखल केले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे