शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सुनील केदार अडचणीत!

By admin | Updated: June 19, 2015 02:29 IST

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आमदार सुनील केदार यांच्या डोक्यावर न्यायालय अवमाननेची तलवार लटकली आहे.

नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आमदार सुनील केदार यांच्या डोक्यावर न्यायालय अवमाननेची तलवार लटकली आहे. उच्च न्यायालयाच्या युगल न्यायपीठाने बँकेतील घोटाळ्याची नवीन चौकशी सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले असतानाही केदार यांनी एका तक्रारीसह एकल न्यायपीठात रिट याचिका दाखल करून चौकशीवर अंतरिम स्थगिती मिळविली आहे. परिणामी केदार अडचणीत आले आहेत.याप्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, प्रकरणातील घडामोडींकडे लक्ष वेधण्यात आल्यानंतर न्यायालय संतप्त झाले. युगल न्यायपीठाच्या आदेशाची माहिती असतानाही एकल न्यायपीठाकडे जाणे व त्यांना युगल न्यायपीठाच्या आदेशासंदर्भात अंधारात ठेवून चौकशीवर अंतरिम स्थगिती मिळविणे न्यायालयाचा अवमान आहे, असे खडेबोल न्यायालयाने केदार यांना सुनावले. तसेच, एकल न्यायपीठापुढील संबंधित रिट याचिका मागे घ्या, अन्यथा पुढील कारवाई करण्यात येईल, अशी तंबी दिली. केदार यांच्या वकिलाने योग्य माहिती घेण्यासाठी वेळ मागितल्यामुळे प्रकरणावर उद्या (शुक्रवारी) सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील घोटाळ्यातील आरोपींमध्ये आमदार सुनील केदार, माजी महाव्यवस्थापक अशोक चौधरी (नागपूर),असे आहे प्रकरणसुरुवातीला यशवंत बागडे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा-१९६० मधील कलम ८८ अंतर्गत घोटाळ्याची चौकशी केली होती. त्यांनी केदार व इतर आरोपींवर १३ पैकी ५ आरोप सिद्ध होत असल्याचा अहवाल दिला होता. याविरुद्ध केदार यांनी सहकारमंत्र्यांकडे अपील केले होते. १४ जून १०१४ रोजी सहकारमंत्र्यांनी अपील मंजूर करून प्रकरण नव्याने चौकशी करण्यासाठी विभागीय निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे परत पाठविले. १६ जून २०१४ रोजी विभागीय निबंधकांनी डॉ. सुरेंद्र खरबडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. यानंतर खरबडे यांनी आरोपींना नोटीस बजावली. यामुळे जुन्याच पुराव्यांच्या आधारे चौकशी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर केदार यांनी खरबडे यांच्यासमक्ष अर्ज सादर केला होता. घोटाळ्याची नव्याने चौकशी करताना नव्याने पुरावे गोळा करण्यात यावेत व जुने पुरावे विचारात घेण्यात येऊ नये, अशी त्यांची मागणी होती. ११ मार्च २०१५ रोजी खरबडे यांनी अर्ज फेटाळून लावला. हा निर्णय देताना सुनावणीची संधी देण्यात आली नाही, असा दावा करून केदार यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत एकल न्यायपीठाने चौकशीवर अंतरिम स्थगनादेश दिला आहे.