शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

सुनील हायटेक इंजिनियर्सला ‘ईडी’चा दणका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:53 IST

प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने बुधवारी सुनील हायटेक इंजिनियर्स लिमिटेडच्या कार्यालयावर कारवाई करीत कंपनीची २५.४४ कोटी रुपयाची मालमत्ता (रोख रक्कम व डिपॉझिट) जप्त केली.

ठळक मुद्दे२५.४४ कोटीची मालमत्ता जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने बुधवारी सुनील हायटेक इंजिनियर्स लिमिटेडच्या कार्यालयावर कारवाई करीत कंपनीची २५.४४ कोटी रुपयाची मालमत्ता (रोख रक्कम व डिपॉझिट) जप्त केली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीने वर्ष २०१६ मध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) तर्फे दाखल अहवालाच्या आधारावर ही कारवाई केली. सूत्रानुसार वर्ष २००८ मध्ये महाराष्ट्र खनिकर्म मंडळाला (एमएसएमसी) चंद्रपूर जिल्ह्यातील अडकोली कोल ब्लॉक वितरित करण्यात आले होते. नंतर एमएसएमसीने संयुक्त उपक्रम (जॉर्इंट व्हेंचर) बेसिसवर खाण विकासासाठी निविदा मागविल्या. यात सुनील हायटेकला हे काम मिळाले, त्याला एमएसएमसीच्या अडकोली येथील कोळसा खाण जॉर्इंट व्हेंचर अंतर्गत विकसित करायची होती. नंतर सुनील हायटेकने आपले शेयर जे. पी. इन्फ्रास्ट्रक्चरला २५.४४ कोटी रुपयात विकले. एमएसएमसीने या सौदेबाजीवर आक्षेप घेतला. हा वाद सीबीआयमध्ये गेला. सीबीआयने २०१६ मध्ये सुनील हायटेकच्या कार्यालयावर धाड टाकली. पुढे सीबीआयने सुनील हायटेकद्वारा जे.पी. इन्फ्रास्टक्चरला शेयर विकल्याचा सौदा हा अवैध असल्याने ईडीला आवश्यक कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार ईडीने सुनील हायटेकच्या मुंबई कार्यालयातून २५.४४ कोटी रुपयाची मालमत्ता जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.   दरम्यान, सुनील हायटेक इंजिनियर्स लि.चे प्रबंध निदेशक सुनील गुट्टे यांनी असा दावा केला आहे की, त्यांची कुठलीही मालमत्ता जप्त (अटॅच) करण्यात आलेली नाही. तसेच त्यांच्या कुठल्याही कार्यालयावर कारवाईसुद्धा झालेली नाही. त्यांना राज्य सरकारकडून मिळणारे क्लेम (दावे) रोखण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी सांगितले की, खाण ही महाराष्ट्र राज्य खनिकर्म मंडळाला वितरित करण्यात आली होती. त्यांच्या कंपनीला ती विकसित करण्याचे कंत्रट मिळाले होते. २०१३ मध्ये कोल ब्लॉक वितरण रद्द झाल्यानंतर समूहाची कंपनी शेल एनर्जीने सरकारवर२८ कोटी रुपयांचा दावा केला होता. सरकारने२५.४४ कोटी रुपये स्वीकृत केले होते. ईडीने हीच रक्कम रोखण्याचे निर्देश सरकारला दिले आहे. त्यांच्या कंपनीला अतार्पयत ईडीकडून कुठलीही माहिती मिळालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयnagpurनागपूर