मुख्य आरोपी राजेश धन्नालाल दवारे याचे घर वनदेवीनगर (गुलशननगर) रेल्वे क्रॉसिंगजवळ आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने तेथे भेट दिली असता त्याच्याच घरी नव्हे तर आजूबाजूच्या पसिरातही सन्नाटा दिसला. दवारेच्या शेजाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची माहिती दुपारी १२ च्या सुमारास कळली. त्यामुळे बाजूच्याने आपले किराणा दुकान बंद केले. परिसरात वेगळेच वातावरण निर्माण झाले. राजेशचे वडील धन्नालाल (वय ४५), आई भूमेश्वरी (वय ४०) आणि अल्पवयीन भाऊ घराचे दार ओढून बाजूच्या घरी शून्यात नजर लावून बसलेले आढळले.
आरोपीच्या घर परिसरात सन्नाटा
By admin | Updated: February 5, 2016 02:37 IST