शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बडोदा बँकेच्या दोन व्यवस्थापकांना समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 12:19 IST

कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनातून अवैध कपात करण्यासंदर्भातील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बडोदा बँकेच्या नवी दिल्ली येथील संसद मार्ग शाखेचे मुख्य व्यवस्थापक व नागपुरातील महाल शाखेचे व्यवस्थापक यांना समन्स बजावला.

ठळक मुद्दे कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनातून अवैध कपात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनातून अवैध कपात करण्यासंदर्भातील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बडोदा बँकेच्या नवी दिल्ली येथील संसद मार्ग शाखेचे मुख्य व्यवस्थापक व नागपुरातील महाल शाखेचे व्यवस्थापक यांना समन्स बजावला.निवृत्ती वेतन खात्यातून एप्रिल-२०१६ पासून दर महिन्याला ५,३३६ रुपये कपात करण्यात आल्यामुळे बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी विष्णू बुराडे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता वरील अधिकाऱ्यांना समन्स बजावला. त्यांना येत्या १० जून रोजी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित होऊन यावर स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश देण्यात आला. तसेच, या आदेशाचे उल्लंघन झाल्यास दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली. पुढील तारखेपर्यंत समाधानकारक आदेश जारी करून त्याची माहिती याचिकाकर्त्याला देण्यात आल्यास दिल्ली येथील मुख्य व्यवस्थापकांना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. केंद्रीय वित्त मंत्रालयालादेखील नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. याचिकेतील माहितीनुसार, बँक व्यवस्थापनाने याचिकाकर्त्याकडून कोणत्याही प्रकारची वसुली करण्याचे निर्देश दिले नाहीत. असे असताना याचिकाकर्त्याच्या निवृत्ती वेतनातून कशाची कपात केली जात आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याचिकाकर्त्याने यासंदर्भात बँकेला निवेदन सादर केले होते, पण त्याची दखल घेतली नाही. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. व्ही. आर. थोटे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय