शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

३० कोटीच्या घोटाळ्यात अमरावती पोलीस आयुक्तांना समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 23:19 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अमरावती जिल्हा परिषदमधील ३० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील एका आरोपीविरुद्ध पुरावे सादर करण्याकरिता अमरावती पोलीस आयुक्तांना समन्स बजावला. त्यांना न्यायालयात उपस्थित होण्यासाठी १९ जुलै ही तारीख देण्यात आली.

ठळक मुद्देहायकोर्ट : १९ जुलैला उपस्थित होण्याचे निर्देश

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अमरावती जिल्हा परिषदमधील ३० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील एका आरोपीविरुद्ध पुरावे सादर करण्याकरिता अमरावती पोलीस आयुक्तांना समन्स बजावला. त्यांना न्यायालयात उपस्थित होण्यासाठी १९ जुलै ही तारीख देण्यात आली.प्रकरणावर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. डॉ. अनिल रोडे असे आरोपीचे नाव आहे. कृषी पंप खरेदी, इंधन खरेदी, सुटे भाग खरेदी इत्यादीमध्ये १९९४ ते २००२ या काळात हा घोटाळा झाला. रोडे १९९४ ते ९८ या काळात जिल्हा परिषदेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी होते. २६ जून २००६ रोजी एफआयआर दाखल झाल्यानंतर सीआयडीने प्रकरणाचा तपास करून २९ अधिकाऱ्यांसह एकूण ९५ आरोपींविरुद्ध विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यान, रोडे यांनी त्यांचा घोटाळ्याशी काहीच संबंध नसल्याचा दावा करून सत्र न्यायालयात दोषमुक्ततेकरिता अर्ज दाखल केला. १० डिसेंबर २०१२ रोजी त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला. त्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने २०१३ मध्ये उच्च न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला. तेव्हापासून अर्ज प्रलंबित होता. गेल्या सुनावणीदरम्यान सरकारला आरोपीविरुद्ध ठोस पुरावे दाखविता आले नाही. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांना न्यायालयात बोलावण्यात आले होते. परंतु, तपास अधिकाऱ्याने बंदोबस्तात व्यस्त असल्यामुळे न्यायालयात उपस्थित होण्याकरिता वेळ मागितला. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने पोलीस आयुक्तांना समन्स बजावला. रोडे यांच्यातर्फे अ‍ॅड. प्रदीप वाठोरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAmravatiअमरावती