शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बस खरेदीसाठी सल्लागाराची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:27 IST

प्रचंड तोट्यात सुरू असलेल्या महापालिकेच्या परिवहन विभागाचा अवाजवी खर्च सुरू असल्याने अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. तेजस्विनी योजनेतर्गत चालविण्यात येणाऱ्या महिलासाठीच्या इलेक्ट्रिक मिडी बसेस खरेदी करण्यासाठी प्रकल्प प्रबंध सल्लागार नियुक्त करण्याचा घाट घातला आहे. यासाठी सात लाखांचा खर्च करण्याची तयारी विभागाने केली आहे.

ठळक मुद्देनागपूर मनपाच्या परिवहन विभागाचा अजब कारभार : तोटा असूनही पैशाची उधळपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रचंड तोट्यात सुरू असलेल्या महापालिकेच्या परिवहन विभागाचा अवाजवी खर्च सुरू असल्याने अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. तेजस्विनी योजनेतर्गत चालविण्यात येणाऱ्या महिलासाठीच्या इलेक्ट्रिक मिडी बसेस खरेदी करण्यासाठी प्रकल्प प्रबंध सल्लागार नियुक्त करण्याचा घाट घातला आहे. यासाठी सात लाखांचा खर्च करण्याची तयारी विभागाने केली आहे.वास्तविक महापालिके च्या परिवहन विभागातील अधिकारी वा बस आॅपरेटरवर नियंत्रण ठेवाऱ्या आयबीटीएम आॅपरेटर करू शकतो. केवळ बसेस खरेदी करण्याच्या प्रक्रियेसाठी सात लाख खर्च करण्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.राज्यातील विविध शहरात महिलांसाठी विशेष बसेस असाव्या. यासाठी तेजस्विनी योजनेंतर्गत महापालिकेला ९.६० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यातून सुरुवातील डिझेल बसेस खरेदी करावयाच्या होत्या. परंतु पर्यावरणाचा विचार करता इलेक्ट्रीक बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सात महिन्यात बसेस खरेदी करण्यात आलेल्या नाही. यामुळे विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. मात्र सल्लागारासाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी चालविली आहे.महिन्याकाठी तीन कोटींचा तोटाशहर बससेवा चालविण्यासाठी महापालिकेने तीन नवीन आॅपरेटर नेमले आहेत़ मात्र, परिवहन सेवेत सुधार होण्याऐवजी ती डबघाईस येत आहे़ कोट्यवधीचा तोटा महापालिकेला सहन करावा लागत आहे़ प्रत्येक महिन्याला तीन ते साडेतीन कोटींचा बोजा सहन करावा लागत आहे. डिसेंबर २०१६ ते डिसेंबर २०१७ या काळात महापालिकेला शहर बसच्या माध्यमातून ४८ कोटी ९४ लाख ८ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले तर, ११० कोटी ६१ लाख ४९ हजार रुपये महापालिकेला बिलापोटी द्यावे लागले.चार महिन्यातील ताळेबंदआॅक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१७ पर्यंंत तिकिट विक्रीतून १९ कोटी ५ लाख ७६ हजार ३६३ रुपये तिजोरीत आले़ ३१ कोटी १४ लाख ४७ हजार ४९९ रुपये इतका खर्च झाला़ जानेवारी २०१८ या महिन्यात ६ कोटी ५७ लाख १० हजार ४७० रुपये इतका महसूल तिकीट विक्रीच्या माध्यमातून गोळा झाला़ ८ कोटी ७० लाख ७ हजार २९१ इतका खर्च झाला़ शुक्रवारी होणाऱ्या परिवहन समितीच्या बैठकीत या खर्चाचा लेखाजोखा मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे़

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर