शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

मायलेकीला उत्पन्नाच्या एक तृतियांश पोटगी योग्य

By admin | Updated: February 11, 2015 02:28 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मायलेकीला निर्धारित उत्पन्नातील एक तृतियांश रक्कम पोटगी म्हणून देण्याचा निर्णय योग्य ठरविला आहे.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मायलेकीला निर्धारित उत्पन्नातील एक तृतियांश रक्कम पोटगी म्हणून देण्याचा निर्णय योग्य ठरविला आहे. महिलेच्या पतीने याविरुद्ध दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. याचिकाकर्ता परभणी जिल्ह्यातील शेतकरी असून तो पत्नी व मुलीचे पालन करण्यास तयार नाही. पुसद सत्र न्यायालयात विविध कागदपत्राच्या आधारे याचिकाकर्त्याचे मासिक उत्पन्न २५ हजार रुपये आढळून आले. यातून पालकांचे योगदान व निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे पिकाचे नुकसान वगळून याचिकाकर्त्याचे १८ हजार रुपये मासिक उत्पन्न निर्धारित करण्यात आले. यापैकी एक तृतियांश म्हणजे ६ हजार रुपये मायलेकीला देण्याचा निर्णय देण्यात आला. उच्च न्यायालयाने या निर्णयात काहीच अवैध नसल्याचे म्हटले आहे. सत्र न्यायालयाने सर्वांना भेडसावणारी वाढती महागाईही विचारता घेतली आहे. सत्र न्यायालयाचा दृष्टिकोन नियमाला धरून आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. सुरुवातीला मायलेकीने पोटगी मिळण्यासाठी पुसद जेएमएफसी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने ३० एप्रिल २००८ रोजी अर्ज निकाली काढून महिलेला १२००, तर मुलीला ६०० रुपये मासिक पोटगीचे आदेश दिले. यानंतर मायलेकीने पोटगी वाढवून देण्यासाठी अर्ज दाखल केला. त्यावर जेएमएफसी न्यायालयाने १५ एप्रिल २०१३ रोजी महिलेला २००० तर, मुलीला १२०० रुपये पोटगी मंजूर केली. यामुळेही समाधान न झाल्यामुळे मायलेकीने सत्र न्यायालयात पुनर्विचार अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने १२ मार्च २०१४ रोजी अर्ज मंजूर करून महिलेची पोटगी वाढवून ४००० तर, मुलीची पोटगी २००० रुपये केली. या निर्णयाविरुद्ध महिलेच्या पतीने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. (प्रतिनिधी)