शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आर्थिक कोंडीमुळे नागपुरात कापड व्यावसायिकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 12:07 IST

आर्थिक कोंडी आणि त्यामुळे वाढलेला घरगुती वाद याला कंटाळून एका व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली. नंदनवन पोलिसांच्या हद्दीतील धन्वंतरी नगरात सोमवारी सकाळी ही घटना घडली.

ठळक मुद्देनंदनवनधील घटना परिसरात हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिक कोंडी आणि त्यामुळे वाढलेला घरगुती वाद याला कंटाळून एका व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली. नंदनवन पोलिसांच्या हद्दीतील धन्वंतरी नगरात सोमवारी सकाळी ही घटना घडली. प्रकाश वालुसा सेलोकर (वय ४०) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. सेलोकर हे वैद्य यांच्या घरी भाड्याने राहत होते. ते काही दिवसांपूर्वीपर्यंत कापडाचा व्यवसाय करायचे. लॉकडाऊनमुळे बहुतांश दुकाने, व्यवसाय बंद पडल्याने अनेक जण बेरोजगार झाले आहेत. सेलोकर यांचेही असेच झाले होते. उदरनिर्वाह चालविण्यासाठी त्यांनी भाजी विकणे सुरू केले. मात्र त्यातून तुटपुंजी मिळकत होत होती. परिणामी त्यांच्या घरात वाद वाढला. यामुळे त्यांची पत्नी स्नेहल तिच्या नंदनवनमधीलच माहेरी निघून गेली. पाच दिवसांपासून प्रकाश आणि त्यांचे ९० वर्षीय वृद्ध वडील असे दोघेच घरी राहत होते. पत्नी रागाने निघून गेल्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याचेही वांधे झाले होते. परिणामी प्रकाश यांची मानसिक अवस्था बिघडली. त्यांनी आज सकाळी १० च्या सुमारास सिलिंगच्या हूकला गळफास लावून आत्महत्या केली. वृद्ध वडिलांना हा प्रकार दिसताच त्यांनी हंबरडा फोडला. आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. प्रकाश यांना खाली उतरविण्यात आले. ते कसलीही हालचाल करीत नसल्याने शेजारच्यांनी नंदनवन पोलिसांना कळविले. नंदनवन पोलिसांनी लगेच प्रकाश यांना मेडिकलमध्ये नेले. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे धन्वंतरी नगरात हळहळ व्यक्त केली जात आहे.तीन दिवसांत दुसरी घटनाकोरोना महामारीने अनेकांच्या हातचा रोजगार हिसकावून घेतला आहे. त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे छोटा मोठा धंदा करून आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या अनेकांची अक्षरश: त्रेधातिरपीट उडाली आहे.तीन दिवसांपूर्वी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कंपनीत सेल्समॅन म्हणून कार्यरत असलेल्या रितेश रामटेके याने पत्नी माहेरी गेल्याचे पाहून गळफास लावून घेतला. तर आता नंदनवनमध्ये ही घटना घडली. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस