शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 12:15 IST

प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस शिपायाने बुधवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देप्रतापनगर पोलीस ठाण्यात होते कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस शिपायाने बुधवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत हिंगणा रोड येथे घडली. पोलिसानुसार कौटुंबिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली, तर ते ठाणेदाराविरुद्ध त्रस्त असल्याचेही बोलले जात आहे.विकास नीळकंठ गुडधे रा. गेडाम ले-आऊट हिंगणा रोड असे मृत शिपायाचे नाव आहे. विकास पूर्वी सैन्यात होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना पोलिसात नोकरी मिळाली. काही दिवस मुख्यालयात राहिल्यानंतर तीन वर्षांपूर्वी त्यांना प्रतापनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली. एमआयडीसी पोलिसानुसार दुपारी २.३० वाजता विकास घरी आले. त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती तर आई व भाऊ दुसऱ्या खोलीत आराम करीत होते. सायंकाळी ६ वाजता पत्नी घरी परतली. तेव्हा त्यांना विकास छताच्या पंख्याला फासावर लटकून होते. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आई व भाऊ आले. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. विकासचा मृत्यू झाला होता. पोलिसांना सूचना देण्यात आली.एमआयडीसीचे ठाणेदार भारत क्षीरसागर घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून पोस्टमार्टमकरिता रुग्णालयात पाठविण्यात आले. प्राथमिक चौकशीत विकासला दारूचे व्यसन होते. तो कौटुंबिक तणावात असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या