शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात मुख्याध्यापकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 16:12 IST

कुही तालुक्यातील चिकना येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनिल बबन बिसने (४९) रा. इतवारी पेठ, उमरेड यांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्देउमरेड परिसरातील सेव मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कुही तालुक्यातील चिकना येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनिल बबन बिसने (४९) रा. इतवारी पेठ, उमरेड यांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आर्थिक चणचणीतून ही आत्महत्या झाल्याचे बोलले जात आहे. उमरेड परिसरातील सेव मार्गावर असलेल्या विहीरीत उडी मारून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.सोमवारी रात्री पत्नी सुहासिनी हिला मित्राकडे पार्टी करायला जातो असे त्यांनी सांगितले होते. सुनिल रात्री घरी परतले नाही. सकाळपासूनच पत्नी आणि कुटुंबियांनी विचारपूस सुरू केली. त्यानंतर सर्वत्र शोधाशोधही सुरू झाली. अशातच सेव मार्गावरील धर्मराज हजारे यांच्या मालकीच्या विहिरीलगत एक चप्पल आणि चष्मा आढळून आला. सुनिल यांचे मित्र लोकनाथ निकोसे यांनी तातडीने सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे गाठून ही माहिती दिली. लागलीच पोलीस घटनास्थळी पोहोचले. लोखंडी गळ टाकण्यात आले. १०.३० वाजताच्या सुमारास त्यांचे प्रेत लोखंडी गळाला लागले. उमरेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेन करण्यात आले. सुनील बिसने हे मनमिळावू आणि अनेकांसाठी मार्गदर्शक होते. त्यांनी अशापद्धतीने आपली जीवनयात्रा संपवावी, यावर कुणाचा विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या आत्महत्येच्या निर्णयामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर मंगळवारी कुही मार्गावरील आमनदी स्मशानभूमीवर अंत्यविधी पार पडला. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चारूदत्त बोरसरे, तारणा बीटचे नायक पोलीस कॉस्टेबल हरीश यंगलवार करीत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्या