शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात उच्चशिक्षित तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 19:10 IST

लॉकडाऊनमुळे आलेल्या नैराश्यातून रविवारी रात्री मानकापूर परिसरात एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्देनैराश्यातून केला आत्मघात : मानकापूरमध्ये घडली घटनालोकमत न्यूज नेटवर्क

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे आलेल्या नैराश्यातून रविवारी रात्री मानकापूर परिसरात एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. अनुराग अशोक तिवारी (वय २८) असे मृताचे नाव आहे. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीनगरमध्ये अनुराग राहत होता.उच्च शिक्षण घेतलेला अनुराग मेडिकलमध्ये पुरविल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपकरणाच्या कामासंबंधीचे सुपरविजन करीत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तो अस्वस्थ होता. कामात मन लागत नाही, असे तो घरच्यांना सांगत होता. तो फारसे बोलतही नव्हता. या पार्श्वभूमीवर, त्याने रविवारी रात्री ११.४५ च्या सुमारास घरी गळफास लावून घेतला. घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला जवळच्या खासगी इस्पितळात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही माहिती कळताच मानकापूरचे पोलीस उपनिरीक्षक कैलास मगर आपल्या सहकाऱ्यांसह अनुरागच्या घरी पोहोचले. त्यांनी घरच्यांना अनुरागच्या आत्महत्येबाबत विचारपूस केली. त्याच्या रूममध्ये एक सुसाइड नोट सापडली. जीवनातील अनेक निर्णय चुकल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे या चिठ्ठीत लिहून होते, असे पोलीस सांगतात. अनुरागच्या या आत्मघातकी निर्णयामुळे त्याच्या घरच्यांना जबर मानसिक धक्का बसला आहे. ते काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते, असे पोलीस सांगतात. योगेश भाऊराव धानोरकर यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. अनुरागच्या आत्महत्येमागचे कारण पोलीस शोधत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर