शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नैराश्यामुळे केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 18:59 IST

बेरोजगारीमुळे नैराश्य आल्याने एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुद्धनगरात सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेरोजगारीमुळे नैराश्य आल्याने एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुद्धनगरात सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली.सुरेश नामदेवराव अर्जापुरे (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पाचपावली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जापुरे जसवंत टॉकीज मागे, बुद्धनगरात कुटुंबीयांसमवेत राहात होते. लॉकडाऊनमुळे हाताला कोणताही कामधंदा नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना दारूचेही व्यसन होते. हातात पैसे नसल्याने व्यसन भागविणेही कठीण झाले होते. त्यामुळे ते तीन-चार दिवसापासून अस्वस्थ होते.दरम्यान, त्यांच्या घरची मंडळी सोमवारी रात्री ८ वाजता टीव्हीसमोर कार्यक्रम बघत बसली. तेही तिथेच होते. काही वेळेनंतर अर्जापुरे टीव्ही समोरून उठून घराच्या मागच्या रूममध्ये गेले. त्यांनी सिलिंग फॅनला दुपट्ट्याने गळफास बांधून आत्महत्या केली. टीव्हीवरील मालिका संपल्यानंतर कुटुंबातील एक सदस्य बाथरूमला जाण्यासाठी मागे आले असता त्यांना अर्जापुरे गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. त्यामुळे आरडाओरड झाली. घरच्यांनी तिकडे धाव घेऊन अर्जापुरे यांना खाली उतरवले. आरडाओरड ऐकून शेजारी गोळा झाले. त्यांनी पाचपावली पोलिसांना सूचना दिली. हवालदार ज्ञानेश्वर जाधव आपल्या सहकाऱ्यांसह पोहचले. त्यांनी अर्जापुरे यांना मेयो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अर्जापुरे यांचे बंधू विनोद नामदेवराव अर्जापुरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर