शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या मौदा भागात शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 19:52 IST

तालुक्यातील बारशी येथील धान उत्पादक शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देबारशी येथील घटनाएक लाख रुपयांचे होते कर्ज थकीत

आॅनलाईन लोकमतमौदा : तालुक्यातील बारशी येथील धान उत्पादक शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. त्या शेतकऱ्याकडे एक लाख रुपयांचे पीककर्ज थकीत असल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली.माणिक रामजी हिवसे (४५, रा. बारशी, ता. मौदा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. माणिक हिवसे यांच्याकडे बारशी शिवारात साडेनऊ एकर शेती आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी बँक आॅफ इंडियाच्या चाचेर शाखेकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मागील वर्षी समाधानकारक पीक हाती न आल्याने त्यांना या कर्जाची परतफेड करणे जमले नाही. या वर्षी त्यांनी धानाची रोवणी केली होती. धानावर सुरुवातीला कडाकरपा आणि नंतर तुडतुड्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. त्यातच अपुरा पाऊस आणि ऐनवेळी पेंच प्रकल्पाचे ओलितासाठी न सोडलेले पाणी यामुळे धानाच्या उत्पादनात घट येणार असल्याने ते चिंतीत होते.दरम्यान, त्यांनी सायंकाळच्या सुमारास शेतातच कीटकनाशक प्राशन केले. ते रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने घरच्या मंडळींनी त्यांचा शोध घेतला असता, ते शेतात पडून असल्याचे आढळून आले. त्यांना लगेच नजीकच्या शासकीय रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. सोमवारी दुपारी मौदा येथे उत्तरीय तपासणी प्रक्रिया आटोपल्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या