शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखाना स्फोट प्रकरण; एकाच वेळी पाचजणांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 10:25 IST

नागपूर जिल्ह्यातील बेला (ता.उमरेड) येथील साखर कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जणांचा काही सेकंदातच जीव गेला. आता आमचे होणार तरी कसे असा हृदय पिळवटून टाकणारा प्रश्न पाचही घरी वारंवार, क्षणाक्षणाला उपस्थित केला होत होता.

ठळक मुद्देचुली पेटल्या फक्त चिमुकल्यांसाठी... वडगाव शोकमग्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरोघरी अश्रूंना वाट मोकळी करून देणारी माणसे. कुणी एकमेकांना आधार देत टाहो फोडत सावरत होते. असे झालेच कसे आणि आता आमचे होणार तरी कसे असा हृदय पिळवटून टाकणारा प्रश्न पाचही घरी वारंवार, क्षणाक्षणाला उपस्थित केला होत होता. शंभरावर वस्ती असलेल्या या छोट्याशा गावात शनिवारी रात्रीपासून अनेकांच्या घरात चूल पेटली नाही.

चिमुकल्यांना अन्नाचे दोन घास मिळावे, यासाठीच त्या गावाची चूल यदाकदाचित पेटली. शनिवारी नागपूर जिल्ह्यातील बेला (ता.उमरेड) येथील मानस अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जणांचा काही सेकंदातच जीव गेला. लीलाधर शेंडे(४६), वासुदेव लडी (३४), मंगेश नौकरकर (२३), सचिन वाघमारे (२७), प्रफुल्ल मून (२५) यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते. रविवारी सकाळपासूनच पाचही कुटुंबातील आप्तस्वकीय, मित्रपरिवार अंत्यविधीसाठी गावात पोहोचले. दुसरीकडे संपूर्ण गावातील खिडक्यांमधून डोकावणारे चेहरे आणि दरवाजात उभे राहून मृतदेह गावात आणले जाणार असल्याने अनेकजण प्रतीक्षा करीत होते. निदान निरोपाच्या अखेरच्या भेटीत चेहरा तरी बघता येणार या विचारांचे चक्र सुरू होते. दुसरीकडे आता येणार थोड्या वेळात आणले जाणार या प्रतीक्षेत दुपारचे ४ वाजले. अखेरीस पाचही जणांचे पार्थिव गावात आणण्यात आले. पुन्हा घरोघरी रडारड सुरू झाली. अश्रू सावरण्यासाठीही कुणी नव्हते. अख्खा गाव रडत होता. लागलीच तडकाफडकी अंत्यसंस्कारासाठी तयारी झाली आणि एकाचवेळी पाचही जणांची अंत्ययात्रा सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास निघाली. एकाचवेळी पाच जणांचे अंत्यसंस्कार बघणाऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी सारेच भावुक झाले होते.

पैसा मिळणार, जीवांचे काय?शनिवारी सकाळीच वासुदेव लडी याने आपल्या मुलांना लवकर परत येतो असे सांगत कारखाना गाठला. लीलाधर शेंडे यांनी पत्नी आणि तीन मुलींना येतो म्हणून सांगितले. सचिन वाघमारे, प्रफुल्ल मून, मंगेश नौकरकर हे तिन्ही कुटुंब आपला मुलगा नेहमीप्रमाणे घरी परत येईल, या आशेवर होते. परंतु शनिवारी दुपारच्या घटनेनंतर पाचही जणांचे थेट मृतदेहच रविवारी घरी पोहोचल्याने सर्वांनाच धक्का बसला. निरोपाच्या अखेरीस आपल्या पतीचा, पित्याचा आणि आपल्या मुलाचा चेहरासुद्धा बघता आला नाही, या वेदनेने दु:ख डोंगराएवढे झाले होते. पैसा मिळणार पण त्या गेलेल्या जीवांचे काय, ती माणसे परत मिळतील काय, असा सवाल प्रत्येकाच्या अंतर्मनात डोकावत होता.

 

टॅग्स :Blastस्फोट