शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सूफी गायन म्हणजे ‘खुदा’ची इबादत’; ‘नूरा सिस्टर्स’ची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 11:33 IST

सूफी ही आमच्यासाठी केवळ गायनाची कला नाही तर आमच्यासाठी ‘खुदा’ची ‘इबादत’च आहे. हे शब्द आहेत आपल्या अनोख्या व उत्स्फूर्त गायनातून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ‘नुरा सिस्टर्स’ यांचे.

ठळक मुद्देसुफी संगीत शाश्वत

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सूफी ही आमच्यासाठी केवळ गायनाची कला नाही तर आमच्यासाठी ‘खुदा’ची ‘इबादत’च आहे. म्हणूनच सूफी गायन करत असताना आम्ही अक्षरश: त्यात तल्लीन होऊन जातो. हे संगीत आमच्या नसानसांमध्ये भिनले असून अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही याची सेवा करत राहू. हे शब्द आहेत आपल्या अनोख्या व उत्स्फूर्त गायनातून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ‘नुरा सिस्टर्स’ यांचे. ज्योती नुरा व सुल्ताना नुरा या ‘नुरासिस्टर्स’ सोमवारी ‘लोकमत’तर्फे आयोजित ‘सूफी नाईट’साठी नागपुरात आल्या. यावेळी त्यांनी ‘लोकमत’समवेत विशेष संवाद साधला.‘नूरां सिस्टर्स’चा संबंध शाम चौरसिया घराण्याशी आहे. अनेक पिढ्यांपासून आमचे कुटुंब सूफी संगीताशी जुळलेले आहे. वडील उस्ताद गुलशन मीर यांच्या अगोदर आजोबा, आई, आजी हे प्रख्यात सूफी गायक होते. अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या परंपरेला कायम ठेवण्याची संधी आम्हाला मिळते आहे हे आमचे चांगले नशीबच आहे. आयुष्यभर स्वरांच्या माध्यमातून या संगीताची सेवा होत राहील, असाच आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

जगाच्या कोपऱ्यात पोहोचविणार सूफी संगीतबदलत्या काळानुसार गीत-संगीताची पद्धतदेखील बदलत आहेत. त्यामुळेच सूफी संगीताचे काय होईल, याला कोण ऐकेल, असा प्रश्नात मनात उपस्थित होणे स्वाभाविक आहे. अनेक वर्षांपासून असे प्रश्न समोर येत आहेत. सूफी संगीत मात्र दररोज नवनवीन शिखरं गाठताना दिसून येत आहे. आतापर्यंत आम्ही देशातील अनेक मोठ्या शहरांत सादरीकरण केले आहे. सूफी संगीत ऐकण्यासाठी उत्सुक नसलेला किंवा न समजणारा आम्हाला एकाही शहरात, कार्यक्रमात आढळून आलेला नाही, अशी भावना सुल्ताना नुरा यांनी व्यक्त केली. सूफी संगीत आवडणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही, तर ती वाढतच चालली आहे. हा आम्हाला मिळालेला आशीर्वादच आहे. या परंपरेला व संगीत वैभवाला चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचा व त्याला समोर नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जगातील कानाकोपऱ्यात आम्ही हे संगीत पोहोचवू असा विश्वास ज्योती नुरा यांनी व्यक्त केला.

तरुणांनादेखील आवडते सूफी संगीतकाळानुरुप गीत-संगीतात नवनवीन प्रयोग होत आहेत. गायनाचा अंदाज बदलतो आहे. तरुणाईची आवड वेगळी आहे. तसे पाहिले तर प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते. मात्र याचा अर्थ ‘पॉप’, ‘रिमिक्स’ किंवा वेगवान संगीतामुळे सूफीला धोका असे नाही. ज्यावेळी ‘खुदा’च्या ‘इबादत’चा मुद्दा असतो तेव्हा सूफी संगीतच आवडते. तरुणाईलादेखील सूफी संगीत आवडते यात शंकाच नाही. अनेक गायकदेखील हे मानतात. सूफी संगीत शाश्वत आहे, असा प्रतिपादन ज्योती नुरा यांनी केले.

तल्लीन होऊन जातोमंचाचे आमच्या आयुष्यात मोठे स्थान आहे. ‘रेकॉर्डिंग’ करताना चुका सुधारण्याची संधी असते. मात्र मंचावर गाताना असे करता येणे शक्यच नसते. त्यामुळे मंचावर जाण्याअगोदर आम्ही आमच्या साधनेमध्ये कुठलीही कमी रहायला नको, अशीच प्रार्थना करतो. याच विचाराने आम्ही गाणे गायला सुरुवात करतो व त्यात तल्लीन होऊन जातो. सर्वकाही आपोआप ठीक होत जाते, असे सुल्ताना नुरा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

आमची जोडी नेहमी कायम राहणारआम्ही दोघीही लहानपणापासूनच सोबत गायन करत आहोत. एकट्याला गाणे गावे लागले, असे आमच्यासोबत कधीही झाले नाही. ‘रियाज’ करताना किंवा जेवण करतानादेखील आम्ही सोबतच गाणे गातो. आयुष्यात आम्हाला एकट्याने गाणे गावे लागू शकते, असे होऊच शकत नाही. आमची जोडी नेहमी कायम राहणार व अशीच प्रार्थना आम्ही करत असतो, असे ज्योती व सुल्ताना नुरा यांनी सांगितले.

टॅग्स :musicसंगीत