शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नव्या दमाने जनसेवा करणार - सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 13:44 IST

गळ्यावरील उपचारानंतर तब्बल दीड महिन्यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शनिवारी नागपुरात आगमन झाले. विमानतळावर मोठ्या संख्येने उपस्थित त्यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी त्यांना घोळका घालत आस्थेने विचारपूस केली. या वेळी मुनगंटीवार यांनी ईश्वर, कुटुंबिय व त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानत पुन्हा नव्या दमाने जनसेवा करणार असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देभेटीसाठी विमानतळावर चाहत्यांची गर्दी

आॅनलाईन लोकमतनागपूर : गळ्यावरील उपचारानंतर तब्बल दीड महिन्यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शनिवारी नागपुरात आगमन झाले. विमानतळावर मोठ्या संख्येने उपस्थित त्यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांनी त्यांना घोळका घालत आस्थेने विचारपूस केली. या वेळी मुनगंटीवार यांनी ईश्वर, कुटुंबिय व त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानत पुन्हा नव्या दमाने जनसेवा करणार असल्याचे सांगितले.विमानळावर केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी मुनगंटीवार यांना मिठी मारली. या वेळी खा. रामदास तडस, आ. नाना शामकुळे, आ. समीर कुणावार, आ. पंकज भोयर, आ, संजय धोटे, आ. किर्तीकुमार भांगडिया यांच्यासह मुनगंटीवार याचे कुटुंबिय, पत्नी सपना मुनगंटीवार, पूजा चकनलवार, ज्योति तोंडुलवार, अमोल चकलनवार, मंजुषा चकलनवार आदी उपस्थित होते. मुनगंटीवार यांचे सहकारी अमोल कोंडबतुनवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांनी विमानतळावर हार-तुरे स्वीकारले नाही. या वेळी मुनगंटीवार म्हणाले, ईश्वराचा आशिर्वाद, कुटुंबियांची भक्कम साथ, लहान-मोठ्यांचा शुभेच्छा यामुळे आपण या व्याधीतून सुखरूप बाहेर आलो. आजवरच्या आयुष्यात आपण लोकसेवेला प्रधान्य दिले. गेली काही दिवस जनतेची कामे करू शकलो नाही. कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊ शकलो नाही. याच्या वेदना होत होत्या. आता पुन्हा ईश्वराने नव्या दमाने काम करण्याची संधी दिली आहे. आज सव्वा महिन्यानंतर कार्यकर्त्यांची भेट होत आहे. अनेकजण स्वागतासाठी आले.शोषीत, पिडीत जनतेची सेवा करायची आहे. जनसामान्यांना जमेल तेवढी मदत करायची आहे. येत्या काळातही जनतेची सेवा करण्याची संधी मिळो, असेही ते म्हणाले.‘‘मुनगंटीवार हे लोकनेते आहे. त्यांना लोकांसाठी धावून जाणे आवडते. मात्र, गेले काही दिवस ते उपचारात व्यस्त होते. त्यांना शांत पाहून मलाही अस्वस्थ वाटत होते. आज शेकडो कार्यकर्त्यांना भेटून त्यांना आनंद झाला. ईश्वराने त्यांना अशीच जनसेवा करण्याची शक्ती देवो.’’- सपना मुनगंटीवार,(पत्नी)

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारministerमंत्री