शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

असे ‘माहेर’ गोड बाई

By admin | Updated: July 21, 2014 00:55 IST

बाहेर पाऊसधारा आणि वानखेडे सभागृहात ओसंडून वाहणारा उत्साह ... एकच जल्लोष! युवती, महिला, वृद्धा साऱ्याच चिंबचिंब... कुणी उखाणे घेण्यात तर कुणी कविता करण्यात. कुणी कोडे

माहेरच्या आठवणीत रममाण झाल्या सखी : कार्यक्रमाला उदंड प्रतिसादनागपूर : बाहेर पाऊसधारा आणि वानखेडे सभागृहात ओसंडून वाहणारा उत्साह ... एकच जल्लोष! युवती, महिला, वृद्धा साऱ्याच चिंबचिंब... कुणी उखाणे घेण्यात तर कुणी कविता करण्यात. कुणी कोडे सोडविण्यात तर कुणी मेंदीच्या रंगात. यातच ‘एक मिनिट गेम शो’चा धमाका आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी साधलेला संवाद ... अविस्मरणीय दिवस ... मनाला इतके निवांत करणारे की स्ट्रेस-बिस शब्दच पोकळ करून टाकणारे...मायेची ऊब देऊन एक नवी ऊर्मी निर्माण करणारे...असे ‘माहेर’ गोड बाई.औचित्य होते लोकमत सखी मंच प्रस्तुत ‘माहेर’ या कार्यक्रमाचे. राजेंद्र मुळक लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने रविवारी आयोजित या ‘माहेरा’त सहभागी झालेल्या प्रत्येक सखीने मौजमस्तीची एकही संधी न दवडता आपल्या माहेराच्या आठवणीत रममाण झाल्या. तितक्याच गहिवरल्यादेखील. उद्घाटन ऊर्जा, नियोजन मंत्री राजेंद्र मुळक व अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्कार विद्या सागर संस्थेच्या संचालिका पद्मजा पाटील, समाजसेविका स्वाती रोटेले, अ‍ॅड. स्मिता सिंगलकर, वीणा दुरुगकर, प्रीती जरगर, नगरसेविका प्रगती पाटील, पद्मा उईके, माजी नगरसेविका कुसुम घाटे आदी उपस्थित होत्या.मुळक म्हणाले, महिलांसाठी मला खूप काही करायचे आहे. महिलांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले आहे आणि देत राहणार आहे. महिलांनी कुठलाही अन्याय सहन करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. उसगावकर यांनी सखींशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, हा कार्यक्रम पाहून मलाही ‘माहेर’मध्ये आल्यासारखे वाटत आहे. सखींची गर्दी पाहून माहेरची ओढ लक्षात येते. उद्घाटनानंतर अशी मी, वन मिनिट शो, उखाणे स्पर्धा, एक मिनिट गेम शो असा भरगच्च खजिना खास सखींसाठी खुला झाला. उखाणे स्पर्धेत पन्नासच्या वर सखींनी उखाणे घेतले. प्रत्येक उखाण्याला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत होती. काही सखी यजमानांचे नाव घेताना लाजल्या, अडखळल्याही; मात्र ही आपली भारतीय संस्कृती, असे प्रेक्षक सखी एकमेकांना समजावून सांगत होत्या. ‘अशी मी’ या स्पर्धेत कितीही कठीण प्रसंग आला तरी मागे हटले नाही. श्रम, जिद्द आणि चिकाटीने कुटुंबाला सावरले. अशा एक नाही तर चाळीसवर सखींनी आपल्या यशोगाथा सांगितल्या. यावेळी उपस्थित सखींनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. ‘एक मिनीट गेम शो’मधून सखींनी अनुभवले बालपण‘माहेर’ या कार्यक्रमाला अँकर, शुभम केचे याच्या ‘एक मिनीट गेम शो’ने आणखी रंगत आणली. ‘आर्म रेसलिंग’, ‘टंग टिष्ट्वस्टर’, टिकली गेम, बॉलिवूड इन्फॉर्मेशन, थर्माकोल हेराफेरी आणि ‘सेफ्टी पीनचा हार’ या अशा फनी गेम्सचा समावेश होता. या खेळांच्या माध्यमातून सगळ्यांनीच आपले बालपण ‘एन्जॉय’ केले. बाहेर धो-धो पाऊस असताना सभागृहाच्या आतील सखींना या पावसाचा जणू विसरच पडला होता. या खेळांच्या माध्यमातून एक निखळ आनंद त्यांनी घेतला. कौटुंबिक जबाबदारी, वय आणि पद विसरून साऱ्याजणींनी साद घालत हा कार्यक्रम एन्जॉय केला. सर्व खेळांमधून उत्कृष्ट ठरलेल्या सखींना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण अर्चना नाईक, वंदना धोटे, साधना चिलमुलवार आणि सीमा भांगे यांनी केले. संचालन नेहा जोशी यांनी केले. कार्यक्रमाला साधना पापळकर, प्रिया छांगाणी, अर्पणा नाईक, लुसी सबास्टीन, इस्माईल बी शेख, अल्का जीभनकर, बॉबीताई, माधवीताई, गायत्री दंदेवार, शोभाताई, लक्ष्मी मेश्राम, ज्योती वारके, पूनम कोकारडे, संगमित्रा गजभिये, शालिनी नायडू, संध्या नायडू, प्रिती छांगानी, किरन तराल, नंदा कोल्हडकर, लुसी बुर्नेड, हेलन अब्रू आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)