लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सहारा इंडिया परिवाराचे चेअरमन सुब्रतो रॉय यांचे रविवारी चॉर्टर्ड विमानाने नागपुरात आगमन झाले आहे. ते सोमवारी दुपारी १२ वाजता कोराडी रोडवरील इन्डोअर स्टेडियममध्ये गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करतील. सोमवारचा कार्यक्रम दिवाळी मिलनचा असल्याचे सूत्रांनी सांगितले.सहारा इंडिया परिवाराशी संलग्न कंपन्यांच्या विविध योजनांमध्ये देशातील हजारो लोकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. पण त्यांना वेळेत परतावा मिळाला नाही.हजारो गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे परत देण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले असतानाही ते परत न केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती.दहा हजार कोटी रुपये जमा केल्यावर त्यांना जामीन देण्याचे न्यायालयाने निश्चित केले होते. पण तो पैसा उभारण्यात सहारा समूह अपयशी ठरला होता. तसेच वर्धा रोडवरील सहारा सिटी या निवासी प्रकल्पात बंगलो आणि फ्लॅट खरेदी केलेल्या अनेक ग्राहकांना अद्यापही त्याचा ताबा मिळालेला नाही, हे विशेष.
सहारा इंडियाचे सुब्रतो रॉय नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:53 IST
सहारा इंडिया परिवाराचे चेअरमन सुब्रतो रॉय यांचे रविवारी चॉर्टर्ड विमानाने नागपुरात आगमन झाले आहे.
सहारा इंडियाचे सुब्रतो रॉय नागपुरात
ठळक मुद्देगुंतवणूकदारांना आज मार्गदर्शन करणार