शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

जिल्हा बँक घाेटाळ्याच्या चौकशीचा अहवाल द्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: August 24, 2022 18:10 IST

२० वर्षे जुन्या या घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार मुख्य आरोपी आहेत.

नागपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीचा प्रगती अहवाल येत्या सात सप्टेंबरपर्यंत सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व उर्मिला जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

२० वर्षे जुन्या या घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार मुख्य आरोपी आहेत. घोटाळा झाला त्यावेळी ते बँकेचे अध्यक्ष होते. बँकेतील १२५ कोटी रुपयांतून सरकारी प्रतिभूती खरेदी करण्यात आले होते. त्यात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यामुळे  झालेले नुकसान भरून काढण्यासाठी दोषी संचालकांची आर्थिक जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्याकरिता, कडक शिस्तीकरिता ओळखले जाणारे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्याकडून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम ८८ अंतर्गत चौकशी केली जात आहे.

घोटाळ्यातील इतर आरोपींमध्ये बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक नामदेव चौधरी, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश दामोदर पेशक, रोखे दलाल केतन कांतिलाल सेठ, सुबोध चंदादयाल भंडारी, नंदकिशोर शंकरलाल त्रिवेदी, अमित सीतापती वर्मा, महेंद्र राधेश्याम अग्रवाल, श्रीप्रकाश शांतिलाल पोद्दार, संजय हरिराम अग्रवाल व कानन वसंत मेवावाला यांचा समावेश आहे. यासंदर्भात शेतकरी ओमप्रकाश कामडी व इतरांची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सरकारच्या वतीने ॲड. दीपक ठाकरे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयSunil Kedarसुनील केदारfraudधोकेबाजीHigh Courtउच्च न्यायालय