शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मासोळी बाजार इमारतीचे डिजाईन सादर करा : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 21:54 IST

मंगळवारी येथील मासोळी बाजारच्या इमारतीचे डिझाईन एक आठवड्यात सादर करण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महापालिकेला दिला.

ठळक मुद्देमहापालिकेला एक आठवड्याचा वेळ

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी येथील मासोळी बाजारच्या इमारतीचे डिझाईन एक आठवड्यात सादर करण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महापालिकेला दिला.मंगळवारी येथे ठोक मासोळी विक्रे त्यांसाठी इमारत बांधण्याकरिता महापालिकेला तीन कोटी रुपयावर निधी मिळाला होता. त्यानंतर महापालिकेने संबंधित निधीतून ठोक विक्रेत्यांसाठी केवळ चार गाळे बांधले तर, किरकोळ विक्रेत्यांसाठी १०८ ओटे तयार करण्यात आले. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने हा आदेश दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.मेयो रुग्णालयापुढील भोईपुरा येथील किरकोळ मासोळी बाजार मंगळवारी मार्केट इमारतीमध्ये स्थानांतरित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रोहित गौर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. स्ट्रिट व्हेंडर्स (प्रोटेक्शन ऑफ लाईव्हलीहूड अ‍ॅन्ड रेग्युलेशन ऑफ स्ट्रिट व्हेंडर्स) अ‍ॅक्ट-२०१४ मधील तरतुदींनुसार या व्यवसायासाठी लायसन्स बंधनकारक आहे. मासोळी विक्रेते या कायद्यातील तरतुदींचे पालन करीत नाही. या बाजारामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. परिसरात प्रदूषण निर्माण होते. मासोळ्यांच्या निरुपयोगी अवयवांची कायद्यानुसार विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. सेजल लखानी, मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अ‍ॅड. एस. एस. सन्याल तर, मध्यस्थातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका