शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सुभाष नगर ते झाशी राणी चौक धावली मेट्रो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 20:37 IST

सर्वत्र स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्साहाचे वातावरण असताना १५ ऑगस्ट रोजी महामेट्रो नागपूरला आणखी एक यशाचा पल्ला गाठण्यात यश आले. स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहूर्तावर रिच-३ (सुभाष नगर मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी) दरम्यान मेट्रोचे पहिले ट्रायल रन उत्साही वातावरणात पार पडले.

ठळक मुद्देरिच-३ : स्वातंत्र्यदिनी मेट्रोचे हिंगणा मार्गावर ट्रायल रन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वत्र स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्साहाचे वातावरण असताना १५ ऑगस्ट रोजी महामेट्रो नागपूरला आणखी एक यशाचा पल्ला गाठण्यात यश आले. स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहूर्तावर रिच-३ (सुभाष नगर मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी) दरम्यान मेट्रोचे पहिले ट्रायल रन उत्साही वातावरणात पार पडले.खापरी ते सीताबर्डी दरम्यान प्रवासी वाहतूक सुरू झाल्यावर या मार्गावर वाणिज्यिक सेवा कधी सुरू होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मेट्रो ट्रेनच्या या ट्रायल रन दरम्यान महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, संचालक (प्रकल्प) महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथुर, संचालक (वित्त) एस. शिवमाथन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुभाष नगर ते झाशी राणी चौक मेट्रो स्टेशन पर्यंत मेट्रो ट्रेनचे ट्रायल रन करण्यात आले. हा प्रवास या भागातील रहिवासी तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांकरिता कुतूहल आणि उत्सुकतेचा विषय ठरला. ट्रेनचा हॉर्न वाजताच हिंगणा मार्गावरून ये-जा करणारे नागरिक आपली वाहने रस्त्याच्या बाजूने उभी करत मेट्रो ट्रेनचे दृश्य बघण्यात मग्न झाले. ट्रेनचे संचालन होत असतांना उत्तर अंबाझरी मार्गावर ये-जा करणारे नागरिक, विद्यार्थी तसेच हिल टॉप, एलएडी कॉलेज चौक, धरमपेठ, शंकर नगर चौक परिसरातील रहिवाशांनी घराच्या गॅलरी व छतावरून मेट्रो ट्रेनच्या ट्रायल रनचे चित्र आपल्या मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये टिपले.डॉ. दीक्षित यांनी महामेट्रोच्या आतापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा प्रवास मांडला. महामेट्रो नागपूर प्रकल्पात उत्कृष्टरीत्या कार्य करून आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकीय संचालक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.महा मेट्रोने गाठलेले महत्वाचे टप्पे

  • २१ ऑगस्ट २०१४ नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे भूमिपूजन
  • १८ फेब्रुवारी २०१५ नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची स्थापना
  • ३१ में २०१५ नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे कार्यारंभ
  • ३० सप्टेबर २०१७ नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ट्रायल रनला सुरुवात
  • २१ एप्रिल २०१८ एयरपोर्ट साऊथ ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान जॉय राईड सुरु
  • ७ मार्च २०१९ रिच -१(खापरी से सीताबर्डी इंटरचेंज) मार्गाचा शुभारंभ
  • १५ ऑगस्ट २०१९ रिच -३ मार्गाच्या ट्रायल रनला सुरुवात