शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

खनिज उद्योगांचे क्लस्टर उभारणार : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 20:26 IST

राज्यात खनिज उद्योग क्षेत्रात वाढीच्या विपुल संधी उपलब्ध आहेत. खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देण्यात येणार असून, खनिजसंपदा असलेल्या ठिकाणी आधारित प्रक्रिया व मूल्यसंवर्धन उद्योग उभारण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरीव सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

ठळक मुद्देमिनकॉन कॉनक्लेव्हचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात खनिज उद्योग क्षेत्रात वाढीच्या विपुल संधी उपलब्ध आहेत. खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टर उभारणीवर भर देण्यात येणार असून, खनिजसंपदा असलेल्या ठिकाणी आधारित प्रक्रिया व मूल्यसंवर्धन उद्योग उभारण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरीव सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.उद्योग आणि खनिकर्म विभाग (एमएसएमसी), विदर्भ इकॉनामिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (वेद) सहकार्याने हॉटेल सेंटर पॉईंट येथे दोन दिवसीय ‘मिनकॉन कॉनक्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल, खासदार कृपाल तुमाने, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई, व्यवस्थापकीय संचालक एस. राममूर्ती, देवेंद्र पारेख, सुधीर पालीवाल, राहुल उपगन्लावार उपस्थित होते.यावेळी ‘एमएसएमसी’ आणि खनिज क्षेत्रातील विविध उद्योग समूहांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. महासँड आणि खनिज क्षेत्रातील उद्योग संधी यासंदर्भातील ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सुभाष देसाई म्हणाले, विदर्भात खनिजउद्योग क्षेत्रात विपुल संधी असून, परिषदेच्या आयोजनामुळे या क्षेत्रातील संधीसंदर्भात विचारमंथन होईल. महत्त्वाच्या खनिजातून मिळणाऱ्या महसुलात वाढ होण्याची आवश्यकता आहे. उद्योगांना वीजदरात आणि खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या क्लस्टरलाही वीजदरात सवलत देण्यात येणार आहे.बंद कोळसा खाणी सुरू करण्यावर भर : नितीन गडकरीगौण खनिज आणि मुख्य खनिजांपासून महसूल प्राप्त होतो. विदर्भात मॅगनिजवर आधारित उद्योग वाढीस मोठी संधी आहे. विदर्भातील बंद पडलेल्या कोळसा खाणी सुरू करून, तेथे कोळशापासून युरिया तसेच मिथेनॉल अशी इतर उत्पादने निर्मिती करण्याचे उद्योग उभारणीवर भर देण्याची आवश्यकता आहे. मिथेनॉलवर चालणाऱ्या ट्रक आणि बसेस आगामी काळात सुरू करण्यात येणार आहेत. बायोडिझेलवर विमानांचे उड्डाण यशस्वी करण्यात येत आहे. बांबूपासून इंधननिर्मितीचे प्रयोगही यशस्वी होत आहेत. विदर्भ हे आगामी काळात जैवइंधनाचे हब म्हणून विकसित होऊ शकते.खनिज उद्योगांना स्वस्त वीज : चंद्रशेखर बावनकुळेसौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही क्रांतिकारक बदल होत आहे. फ्लाय अ‍ॅशसंदर्भात स्वतंत्र धोरण असून, फ्लाय अ‍ॅश क्लस्टरची उभारणी नागपूर व चंद्रपूर येथे होत आहे. खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठीही वीजदरात सवलत देण्यात येणार आहे. खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी एक्स्प्रेस फीडरद्वारे मुबलक वीज उपलब्ध करून देण्यात येईल.आशिष जयस्वाल म्हणाले, वने, पर्यटन आणि खनिजसंपदा ही विदर्भाची बलस्थाने असून, खनिज क्षेत्रातील उद्योगांच्या वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. खनिज क्षेत्रातील प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धित उद्योग विदर्भातच निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. खनिजाच्या रॉयल्टीतून मिळणाऱ्या निधीतून काही भाग संबंधित जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्याचे धोरण आहे.याप्रसंगी सतीश गवई व देवेंद्र पारेख यांनी अर्थव्यवस्थेला आणि उद्योगक्षेत्राला चालना देणे गरजेचे असल्याचे सांगितले. खनिज क्षेत्रातील उद्योगांसाठी सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत. या क्षेत्रातील उद्योगात आता प्रक्रिया उद्योग आणि मूल्यसंवर्धन उद्योगांची वाढ होणे गरजेचे आहे. संचालन रिना सिन्हा व अतुल ताजपुरिया यांनी तर शिवकुमार राव यांनी आभार मानले.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईbusinessव्यवसाय