शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विषारी साप पकडून स्टंटबाजी ! सापांचे प्रदर्शन, असे कृत्य ठरू शकते जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 23:17 IST

शहरातील अनेक सर्पमित्रांद्वारे साप पकडण्यासाठी ५०० ते १००० रुपये वसूल करण्यासोबतच सापांचे प्रदर्शन करण्याच्या घटना पुढे येत आहेत. अनेक नवशिके साप कसा पकडायचा हे शिकल्यानंतर बहादुरी दाखविण्यासाठी स्टंटबाजी करीत आहेत. अनेकदा काही सर्पमित्र विषारी साप हातात पकडून त्यांच्यासोबत स्टाईलमध्ये फोटो काढत आहेत. त्यांचे हे कृत्य जीवघेणे ठरू शकते. परंतु वन विभागातर्फे ठोस कारवाई होत नसल्यामुळे त्यांचा बंदोबस्त होत नसल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देव्हॉट्सअप प्रोफाईल, फेसबुकवर फोटो अपलोड करण्याची क्रेझ

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरातील अनेक सर्पमित्रांद्वारे साप पकडण्यासाठी ५०० ते १००० रुपये वसूल करण्यासोबतच सापांचे प्रदर्शन करण्याच्या घटना पुढे येत आहेत. अनेक नवशिके साप कसा पकडायचा हे शिकल्यानंतर बहादुरी दाखविण्यासाठी स्टंटबाजी करीत आहेत. अनेकदा काही सर्पमित्र विषारी साप हातात पकडून त्यांच्यासोबत स्टाईलमध्ये फोटो काढत आहेत. त्यांचे हे कृत्य जीवघेणे ठरू शकते. परंतु वन विभागातर्फे ठोस कारवाई होत नसल्यामुळे त्यांचा बंदोबस्त होत नसल्याचे वास्तव आहे.सामान्यपणे अशा सर्पमित्रात विषारी ब्लॅक कोबरासह इतर साप हातात पकडणे, कधी कधी सापाला जमिनीवर ठेवून त्याच्यासमोर झोपून काढलेले फोटो व्हॉट्सअप प्रोफाईलवर ठेवण्याची क्रेझ वाढली आहे. अशा प्रकारचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात. काही नागरिकांनी असे फोटो फेसबुकवर अपलोड केले आहेत. काही सर्पमित्रांनी यापुढे जाऊन स्टंटबाजीचे व्हिडीओसुद्धा तयार करून यु ट्युबवर टाकले आहेत. हे व्हिडीओ पाहून इतर अप्रशिक्षित युवकांना साप पकडून स्टंटबाजी करण्याची प्रेरणा मिळू शकते. अशा वेळी युवकांचे हे कृत्य धोकादायक आहे. परंतु यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण होत नसल्यामुळे हे प्रकार बिनधास्तपणे सुरू आहेत.कोठे सक्रिय आहेत स्टंटबाजसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही स्टंटबाज सर्पमित्र हिंगणाच्या पलाई मेंढा, डेग्माच्या महादेवखोरी आणि गोरेवाडा वनक्षेत्राच्या आजूबाजूला सक्रिय आहेत. या वन क्षेत्रात जाऊन काही सर्पमित्र आपल्या सहकाऱ्यांसह सापासोबत फोटो काढतात.फोटो पाठवा, कारवाई करूवन विभागाच्या नागपूर सर्कलचे विभागीय अधिकारी (व्हिजिलन्स) एस. के. त्रिपाठी यांनी अशा सर्पमित्रांचे स्टंटबाजी करतानाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड झाल्यास किंवा व्हायरल झाल्यास तपासानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. वन्यजीव प्रेमींनी किंवा नागरिकांनी असे फोटो मिळाल्यास वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवावे. अशा व्यक्तींना शोधून वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.काही जणांचा शोध सुरूसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिजिलन्सला काही सर्पमित्रांचे स्टंटबाजी करतानाचे फोटो मिळाले आहेत. अशा व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश वन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

टॅग्स :snakeसापStuntmanस्टंटमॅन