शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत आरडी परेडमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा नागपुरात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 09:59 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिल्ली जिंकून आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

ठळक मुद्देलावणीनृत्याने रिझवले प्रेक्षकांना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत केवळ भौगोलिकदृष्टीनेच नाही तर सांस्कृतिकदृष्टीनेही समृद्ध आहे. याच संस्कृतीची झलक विद्यार्थ्यांच्या सादरीकरणात मी पाहिली. आरडी परेडमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या या विद्यार्थ्यांनी आज नागपुरात दिल्लीच्या राजपथाची अनुभूती दिली, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिल्ली जिंकून आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात रविवारी आयोजित कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांच्या भविष्यातील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आ. परिणय फुके हेसुद्धा या कौतुक सोहळ्यात सहभागी झाले होते. या मान्यवरांच्या हस्ते बेरदी नृत्य सादर करणाºया १६० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या चमूचे प्रशिक्षक किशोर हम्पीहोळी यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. संचालन श्वेता शेलगांवकर यांनी केले.

गीतांजलीच्या कथ्थकने जिंकलेया समारोहाचे दुसरे सत्र नृत्यांनी रंगले. दिल्लीहून आलेल्या गीतांजली शर्मा यांनी सर्वप्रथम प्रस्तुती दिली. नमो शिवाय या कथ्थक नृत्याद्वारे त्यांनी मंचावर शिवमहिमा साकारला. त्यांची द्वितीय प्रस्तुती असलेला कृष्णा-राधा संवादही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेला.

गुलाबी थंडीत लावणीचा तडकायवतमाळहून आलेली स्नेहा कोडापे आणि त्यांच्या चमूने गुलाबी थंडीत लावणीच्या तडक्याने रंग भरला. मनीषा थापा या गुणी गायिकेच्या कसदार आवाजात या नृत्यांगनांनी फटकेबाज लावणी सादर केली. ‘सांगा न कशी मी दिसते नऊवारी साडीत...’ या लावणीपासून सुरू झालेला हा प्रवास पुढे खेळताना ‘रंग बाई होळीचा...’ ‘ रेशमाच्या रेघांनी...’ असा खडी लावणीमार्गे ‘झाल्या तिन्ही सांझा...’ या बैठकीच्या लावणीजवळ येऊन विसावला.

टॅग्स :cultureसांस्कृतिक