शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईअंतर्गत प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना मिळणार न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 20:25 IST

आरटीईच्या प्रथम टप्प्यात लॉटरी लागल्यानंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या बालकांना पुन्हा प्रवेशाची संधी मिळणार आहे. आरटीईच्या दुसºया टप्प्यात या मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. राज्याचे अवर सचिव संतोष गायकवाड यांनी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) ला ही माहिती दिली.

ठळक मुद्देदुसऱ्या टप्प्यात मिळणार प्रवेश : चुकीच्या मॅपिंगमुळे प्रवेशात अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरटीईच्या प्रथम टप्प्यात लॉटरी लागल्यानंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या बालकांना पुन्हा प्रवेशाची संधी मिळणार आहे. आरटीईच्या दुसºया टप्प्यात या मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. राज्याचे अवर सचिव संतोष गायकवाड यांनी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) ला ही माहिती दिली.आरटीईच्या पहिल्या टप्प्यात ज्या बालकांची निवड झाली होती. त्यातील काही बालकांचे प्रवेश रद्द करण्यात आले होते. नियमानुसार त्यांच्या घराचे अंतर शाळेपासून एक ते तीन किलोमीटरच्या परिघात येत नाही. नागपूरच नाही तर संपूर्ण राज्यात या अडचणी आल्या होत्या. यासंदर्भात आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे मो. शाहीद शरीफ यांनी यासंदर्भात राज्य शासनाला पत्र लिहिले. यात उल्लेख केला की चुकीच्या गुगल मॅपिंगमुळे बालक पात्र असूनही त्याला आरटीईचा लाभ मिळू शकला नाही. या प्रकरणाचा तपास करून गरीब व वंचित वर्गाच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची त्यांनी मागणी केली. शाहीद शरीफ यांच्या पत्राची शिक्षण विभागाने दखल घेतली.शाहीद शरीफ यांनी एनसीपीसीआरलासुद्धा पत्र लिहिले होते. एनसीपीसीआरचे वरिष्ठ समन्वयक रमन गौर यांनी याप्रकरणी राज्य शासनाला पत्र पाठविले. त्यामुळे शिक्षण विभागाने यावर लगेच दखल घेतली.दुसºया टप्प्याच्या प्रक्रियेला उशीरआरटीईच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया १० मे ला संपली. लगेच दुसरी प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र एक महिना झाल्यानंतरही प्रक्रिया सुरू झाली नाही. प्रक्रियेच्या नावावर अर्जामध्ये सुधार करण्याची संधी पालकांना दिली आहे. शिवाय ज्या मुलांचे आॅनलाईन अर्ज काही कारणास्तव जमा झाले नव्हते. त्यांना पुन्हा अर्ज जमा करण्याची संधी देण्यात आली आहे. लवकरच दुसरा ड्रॉ काढण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.३९०४ जागेवर झाले प्रवेश६७५ शाळांमध्ये आरटीईच्या ७२०४ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी २६००० बालकांचे आॅनलाईन अर्ज आले होते. पहिल्या टप्प्यासाठी झालेल्या लॉटरीमध्ये ५७०१ बालकांची निवड करण्यात आली होती. १० मेपर्यंत ३९०४ मुलांनी प्रवेश घेतले होते.

 

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थी