शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अवैध वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:28 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम आहेत, असे असतानाही अवैध वाहनांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. वाहतूक शाखा नागपूर ग्रामीणने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला घेऊन गेल्या सहा दिवसात तपासणी मोहीम हाती घेतली होती. यात २३२ वाहने दोषी आढळली.

ठळक मुद्दे२३२ वाहनांवर कारवाई : वाहतूक शाखा नागपूर ग्रामीणची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम आहेत, असे असतानाही अवैध वाहनांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. वाहतूक शाखा नागपूर ग्रामीणने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला घेऊन गेल्या सहा दिवसात तपासणी मोहीम हाती घेतली होती. यात २३२ वाहने दोषी आढळली. त्यांच्यावर कारवाई करून १ लाख २१ हजार १०० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.वाहतूक शाखा ग्रामीणच्यावतीने ३ ते ९ एप्रिल दरम्यान स्कूल बस, स्कूल व्हॅनसह विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी खापरख्ोडा, काटोल, कोंढाळी, मौदा, कन्हान, बोरी, एमआयडीसी बोरी, रामटेक, सावनेर, केळवद, कळमेश्वरच्या हद्दीत करण्यात आली. मोटार वाहन कायद्यानुसार जे वाहन विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करीत होते, स्कूल व्हॅन व बस चालविताना धुम्रपान करीत होते, युनिफॉर्मचा वापर न करता व बॅच न लावता वाहन चालवित होते, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविण्यात आले होते, सीटबेल्टचा वापर नव्हता, वाहन चालविताना मोबाईलचा वापर केला जात होता, ज्या स्कूल बसमध्ये अटेन्डंट नव्हते, वाहनाचे पी.यु.सी, फिटनेस प्रमाणपत्र नव्हते, वाहनाचे मुळ कागदपत्र नव्हते अशा एकूण २३२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख २१ हजार १०० रुपयांचे तडजोड शुल्कही आकारण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीणचे शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीणचा मोनिका राऊत, पोलीस उपअधीक्षक कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए.बी. शेख, पोलीस उपनिरीक्षक मल्हारी ताळाकोटे, सतीश सोनटक्के व सहकाºयांनी केली.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीTravelप्रवास