शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अभ्यासाच्या दडपणामुळे नागपुरात विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 11:59 IST

अभ्यासाच्या दडपणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आयआयटीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने बजाजनगरात गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्देआयआयटीची तयारी जड झाली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभ्यासाच्या दडपणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आयआयटीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने बजाजनगरात गळफास लावून आत्महत्या केली. अंकित अरविंद आसुटकर (वय १७) असे मृताचे नाव आहे. तो भद्रावती (जि. चंद्रपूर) येथील पांडव वॉर्डातील मुळ निवासी होता. १० वीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवणाऱ्या अंकितने आयआयटीची तयारी करण्यासाठी नागपुरात शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यानुसार, त्याच्या पालकांनी अंकितला डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रवेश मिळवून देत, येथील एका कोचिंग क्लासमध्ये आयआयटीचे क्लासही लावून दिले.अंकित रामदासपेठेतील वानखेडे हॉलच्या मागे पराग वानखेडे यांच्या घरी किरायाच्या रूममध्ये राहत होता. अत्यंत मितभाषी असलेल्या अंकितला शनिवारी सायंकाळी त्याच्या आईने फोन केला. बराच वेळ संपर्क करूनही तो प्रतिसाद देत नसल्याने त्याच्या मित्रांकडे संपर्क करून विचारणा केली. त्याच्या वर्गमित्रांनीही अंकितबाबत काही माहिती दिली नसल्याने आईने त्यांना रुमवर बघण्यास सांगितले.मित्रांनी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान रुमवर बघितले असता त्याने सिलींग फॅनला टॉवेलच्या साहाय्याने गळफास लावुन घेतल्याचे उघडकीस आले. मित्रांनी अंकितच्या आईवडिलांना आणि नंतर पोलिसांना ही माहिती कळविली.पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्या रुममध्ये एक चिठ्ठी आढळली. इंग्रजीत लिहिलेल्या या चिठ्ठीतून अंकितने अभ्यासाच्या दडपणामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला.विलास नारायण हजारे (रा. त्रिमूर्तीनगर) यांनी दिलेल्या माहितीवरून बजाजनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या