शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा भागात विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:52 IST

इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत बंद करून गळफास लावत आत्महत्या केली. ही घटना नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसापूर येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्देघरी खोलीत लावला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत बंद करून गळफास लावत आत्महत्या केली. ही घटना नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसापूर येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.दर्शन संजय कडू (१४, रा. इसापूर, ता. सावनेर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. दर्शन हा दहेगाव (रंगारी) येथील सिक्रेट हार्ट अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता. तो सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शाळेतून घरी परत आला होता. त्याने कपडे बदलविले आणि टीव्ही चालू करून खोलीचे दार आतून बंद केले. सायंकाळी त्याचा लहान भाऊ शाळेतून घरी आला. त्याने दार उघडण्यासाठी दर्शनला जोरजोरात आवाज द्यायला सुरुवात केली.बराच वेळ आवाज देऊनही आतून प्रतिसाद येत नसल्याने त्याने घराच्या मागच्या भागाला असलेल्या दारातून आत प्रवेश केला. तेव्हा त्याला दर्शन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने लगेच आरडाओरड करीत शेजाºयांना व नंतर शेतात गेलेल्या आई, वडील व आजीला बोलावले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्याच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दर्शनने आत्महत्या का केली, हे मात्र कळू शकले नाही. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.‘डिप्र्रेशन’ची शक्यतादर्शन गेल्या तीन दिवसांपासून शिकवणी वर्गालाही गेला नव्हता. या संदर्भात त्याच्या वर्गातील विद्यार्थिनीने सांगितले की ‘सिव्हिक्स’चा वर्ग सुरू असताना प्राचार्या त्याच्यासोबत अन्य विद्यार्थ्यांवर रागावल्या होत्या. पेपरला (परीक्षा) बसू देणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली होती. या प्रकारामुळे दर्शन ‘डिप्रेशन’मध्ये असावा आणि त्यातूनच त्याने सदर पाऊल उचलले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSuicideआत्महत्या