शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

‘त्या’ विद्यार्थ्यांची ‘पेट’ची संधी हुकली

By admin | Updated: September 18, 2015 02:52 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएचडी नोंदणीसाठी अत्यावश्यक असलेल्या ‘पेट’ला (पीएचडी एन्ट्रन्स टेस्ट) यंदा ‘रेकॉर्ड’ प्रतिसाद मिळाला आहे.

नागपूर विद्यापीठ : दिलासा देण्याची मागणीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पीएचडी नोंदणीसाठी अत्यावश्यक असलेल्या ‘पेट’ला (पीएचडी एन्ट्रन्स टेस्ट) यंदा ‘रेकॉर्ड’ प्रतिसाद मिळाला आहे. परंतु विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल रखडल्यामुळे काही विद्यार्थी ‘पेट’साठी अर्जच करू शकले नाही. विद्यापीठाच्या लेटलतिफीमुळे ‘पेट’ची संधी हुकली असून आम्हाला दिलासा देण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.नागपूर विद्यापीठात दरवर्षी ‘पेट’ या ‘आॅनलाईन’ परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यंदापासून प्रश्नपत्रिका इंग्रजी व मराठीसोबतच हिंदी भाषेतदेखील राहणार आहे. त्यामुळे हिंदीभाषिक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत अर्ज भरले आहेत. ‘पेट’चे स्वरूप पुढील वर्षीपासून बदलण्यात येणार असल्याची शक्यता असल्याने, अंतिम वर्षातील अनेक विद्यार्थ्यांचा याच वर्षी ‘पेट’ देण्याकडे ओढा होता. ९ ते ११ आॅक्टोबरदरम्यान होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर ही होती.परंतु विद्यापीठाच्या काही अभ्यासक्रमांच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल अद्यापही प्रलंबित आहेत. यात प्रामुख्याने ‘डेझर्टेशन’चा समावेश असलेल्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अशा अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांचे अंतिम वर्षाचे निकालच हाती नसल्याने त्यांना ‘पेट’ देण्याची इच्छा असूनदेखील अर्ज भरता आलेले नाहीत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला निकाल जाहीर होतील अशी विद्यार्थ्यांना अपेक्षा होती; परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली.(प्रतिनिधी)आता वर्षभर प्रतीक्षाज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता आलेले नाहीत, त्यांना ‘पेट’ देण्यासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. ‘पेट’मध्ये संधी मिळावी यासाठी विद्यापीठाने निकाल लावून दिलासा द्यावा व परीक्षेचा अर्ज भरण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. यासंदर्भात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.