शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक आणीबाणीमुळे युकेमध्ये विद्यार्थी संकटात; निर्वाह भत्ता वाढविण्याची भारतीय मुलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 08:16 IST

यु.के.मध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना वाईट परिस्थितीबाबत जाणीव करून दिली.

- निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरातील अनेक देश सध्या महागाई आणि आर्थिक संकटांचा सामना करीत आहेत. या देशांमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही या संकटाचा सामना करावा लागत आहे. युनायटेड किंगडम (यु.के.) मध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या याच अवस्थेतून जावे लागत आहे. या देशात सध्या आर्थिक आणीबाणीची स्थिती असून, महागाईने स्थानिक नागरिकांची दैनावस्था झाली आहे. यात भारतीय विद्यार्थीही हाेरपळले जात आहेत. 

यु.के.मध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना वाईट परिस्थितीबाबत जाणीव करून दिली. आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी राज्य व केंद्र शासनाकडून शिष्यवृत्ती व निर्वाह भत्ता दिला जाताे. युकेमध्ये आर्थिक संकट निर्माण झाले आहे. प्रत्येक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. एकीकडे विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे व दुसऱ्या बाजूला आर्थिक संकट झेलणे, यामुळे भारतीय विद्यार्थ्यांची गळचेपी झालेली आहे. 

१२ वर्षांपासून निर्वाह भत्ता तेवढाच महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती याेजनेअंतर्गत यु.के.मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक ९९०० पाउंड म्हणजेच ८२५ पाउंड दरमहा निर्वाह भत्ता दिला जातो. यात १०-१२ वर्षांपासून वाढ झाली नाही. सध्या लंडनमध्ये घरभाडे ९०० ते १००० पाउंड किंवा जवळपास १ लाख रुपयांपर्यंत आहे. लंडनच्या बाहेर ८०० ते ९०० पाउंड आहे. या तुटपुंज्या रकमेत भाेजन व इतर खर्च कुठून करावा, असा निर्वाणीचा प्रश्न विद्यार्थ्यांसमाेर आहे. सरकारने यात लक्ष  घालावे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

कुणी वेटर, कुणी पंपावर राज्य शासनातर्फे गेल्या दशकभरापासून या निर्वाह भत्त्यात वाढ करण्यात आलेली नाही. अनेक विद्यार्थ्यांना तिथे पेट्राेल पंप किंवा हॉटेलमध्ये वेटर किंवा इतर क्षुल्लक काम करून दैनंदिन गरजांची पूर्तता स्वतः करावी लागते. विद्यार्थ्यांना संकटातून काढण्यासाठी दि. प्लॅटफार्म संघटनेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री व समाजकल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले असल्याचे संघटनेचे सदस्य राजीव खाेब्रागडे यांनी सांगितले.

टॅग्स :Englandइंग्लंड