शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहातील ‘त्या’ विद्यार्थ्यांना कुलगुरूंचा ‘अल्टिमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 23:42 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात नियमबाह्य पद्धतीने राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी ‘अल्टिमेटम’च दिला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत जर विद्यार्थ्यांनी खोल्या रिकाम्या केल्या नाहीत तर त्यांना थेट ‘रस्टिकेट’ करण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे राहत असून त्यांच्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना खोल्या उपलब्ध झालेल्या नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : मंगळवारपर्यंत खोल्या रिकाम्या केल्या नाहीत तर ‘रस्टिकेट’ करणार : वर्षानुवर्षे राहत आहेत विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात नियमबाह्य पद्धतीने राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी ‘अल्टिमेटम’च दिला आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत जर विद्यार्थ्यांनी खोल्या रिकाम्या केल्या नाहीत तर त्यांना थेट ‘रस्टिकेट’ करण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्ये अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे राहत असून त्यांच्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना खोल्या उपलब्ध झालेल्या नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील वसतिगृहामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ११९ विद्यार्थ्यांची ही समस्या आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ३० एप्रिलला वसतिगृह रिकामे करावे, असे निर्देश विद्यापीठाकडून देण्यात आले होते. मात्र काही जणांच्या परीक्षा बाकी असल्याने विद्यापीठाने ही मुदत १० जूनपर्यंत वाढविली. मात्र तरीदेखील विद्यार्थी निघाले नाहीत. त्यानंतर ही मुदत १० जुलैपर्यंत वाढविण्यात आली. तोपर्यंत नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे वसतिगृहासाठी अर्ज येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे ११९ विद्यार्थ्यांनी १० आॅगस्टपर्यंत खोल्या रिकाम्या करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले. तरीदेखील विद्यार्थ्यांनी खोल्या सोडल्या नाहीत. अखेर नाईलाजाने विनापरवानगी राहणाºया विद्यार्थ्यांच्या खोल्यांना सुरक्षारक्षकांनी टाळे ठोकले.या मुद्यावरुन विद्यार्थ्यांनी दोनदा विद्यापीठात आंदोलन केले. एकदा तर ‘कॅम्पस’च्या प्रवेशद्वाराला टाळेदेखील ठोकले.सोमवारी विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेतली व वसतिगृहात राहू देण्याची विनंती केली. मात्र कुलगुरूंनी ही विनंती फेटाळून लावली. एकदा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करताना वसतिगृहात राहिलेल्या विद्यार्थ्याला परत दुसºया पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर नियमानुसार लगेच वसतिगृह देता येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा प्रथम वर्ष प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यानंतर जर काही जागा रिक्त राहिल्यास दुसºयांदा पदव्युत्तर प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाईल, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. ११९ विद्यार्थ्यांपैकी ८० जणांनी दुसरीकडे राहण्याची सोय केली आहे. मात्र इतर विद्यार्थ्यांनी अद्याप आपले सामान नेलेले नाही. या विद्यार्थ्यांनी मंगळवारपर्यंत खोल्या रिकाम्या केल्या नाहीत तर थेट ‘रस्टिकेट’च करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.नवे विद्यार्थी खोळंबलेदरम्यान, विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया आटोपली असून, बाहेरील अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. वसतिगृहाच्या खोल्यांचे या विद्यार्थ्यांना कागदोपत्री वाटप झाले आहे. मात्र जुन्या विद्यार्थ्यांनी अद्याप खोल्या रिकाम्या केल्या नसल्यामुळे नवीन विद्यार्थी तेथे राहायला जाऊ शकलेले नाहीत. जुन्या विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांचा विचार करायला हवा, असे कुलगुरूंनी सांगितले.आता कशाला हवे वसतिगृह?वसतिगृहात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही जणांनी तर तिस ऱ्यांदा पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला आहे. काही जण तर नोकरीदेखील करीत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे काही जण तर कुठलेच विद्यार्थी नसतानादेखील तेथे राहत आहेत. अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह कशाला हवे व नव्यांना संधी मिळणार कधी, असा प्रश्न कुलगुरूंनी उपस्थित केला.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी