शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘न्युक्लिअर एनर्जी’चा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 23:01 IST

कोळशापासून वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. पाण्यापासून वीजनिर्मिती करताना धरण बांधणे, नागरिक विस्थापित होतात. परंतु न्युक्लिअर एनर्जी कशा प्रकारे पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त आहे, याची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आली.

ठळक मुद्देपरमाणु खनिज संचालनालयातर्फे प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोळशापासून वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. पाण्यापासून वीजनिर्मिती करताना धरण बांधणे, नागरिक विस्थापित होतात. परंतु न्युक्लिअर एनर्जी कशा प्रकारे पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त आहे, याची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात आली.परमाणु खनिज संचालनालयातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सिव्हिल लाईन्स येथे न्युक्लिअर एनर्जीबाबतच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनात अ‍ॅटामिक एनर्जी विभागातर्फे युरेनियमपासून कशी वीज निर्मिती होते, याची माहिती विद्यार्थ्यांना प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात आली. शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या हजारो विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. २८ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक संचालक सुरेश कुमार, वैज्ञानिक अधिकारी डॉ. पटवर्धन यांनी दिली.न्युक्लिअर एनर्जी पर्यावरणासाठी उपयुक्तपाण्यापासून वीज निर्मिती करताना २ ते ५ हजार हेक्टर जागा लागते. याशिवाय धरण बांधण्याच्या शेकडो नागरिकांना विस्थापित व्हावे लागते. कोळशापासून वीजनिर्मिती करताना ७० हेक्टर जागा, मोठ्या प्रमाणात कोळसा लागून प्रदूषण होते. परंतु न्युक्लिअर एनर्जीत फक्त २० हेक्टर जागेवर विजनिर्मिती करता येते. यात केवळ १६० टन युरेनियम लागते.विविध यंत्रांच्या माध्यमातून शोधजमिनीतील युरेनियम शोधताना परमाणु खनिज संचालनालयाच्या वतीने विविध यंत्रांच्या माध्यमातून जमिनीतील युरेनियम शोधण्याचा प्रयत्न करण्यात येतो. यात जी.एम. काऊंटर, सिन्टीलोमिटर आणि डिफरेन्शियल स्पेक्ट्रममापी या यंत्रांचा समावेश आहे. हा यंत्राद्वारे कोणत्या भागात जमिनीत युरेनियम दडले आहे, याची माहिती मिळते.खडकांचे रासायनिक विश्लेषणएखाद्या भागात युरेनियम आहे याची माहिती मिळाल्यानंतर तेथील जमिनीतील खडकात किती प्रमाणात युरेनियम आहे याचे विश्लेषण करण्याचे काम परमाणु खनिज विभागात करण्यात येते. यात विविध प्रकारचे यंत्र वापरून ५२ ते ५३ प्रकारचे रासायनिक तत्त्व वेगवेगळे करण्यात येतात.‘ड्रिलिंग’ केल्यावर मिळतो आतील दगडयुरेनियम जमिनीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर परमाणु विभागातर्फे कोअरींग ड्रिलिंग करण्याचा निर्णय घेण्यात येतो. यात मशीनद्वारे आतील दगड, खडक बाहेर काढण्यात येतो. यामुळे दगड जमिनीत किती अंतरावर आहे, कुठे आहे याची नेमकी माहिती मिळण्यास मदत होते. त्यानंतर संबंधित ठिकाणी खोदकाम सुरू करायचे की नाही याचा निर्णय घेण्यात येतो.

 

टॅग्स :scienceविज्ञानtechnologyतंत्रज्ञान